मुंबई: प्रत्येक घरात तिजोरी ही असतेच मात्र ही तिजोरी योग्य तसेच शुभ स्थानावर न ठेवल्यास कुटुंबावर आर्थिक संकट येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरी ही नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवली पाहिजे. असे यासाठी कारण कारण उत्तर दिशेला स्वामी कुबेर देवतेचे स्थान मानले जाते.
तिजोरीचे दार नेहमी पूर्व दिशेला उघडणारे असावे. लक्षात ठेवा की तिजोरीचे गेट कधीही दक्षिण दिशेला उघडू नये. असे केल्यान धनलाभामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
तिजोरी कधीही वॉशरूमच्या समोर अथवा जवळ असता कामा नये. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते तसेच धनहानी होते.
घरातील तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. यात पैशांसोबत आपले दागिने तसेच किंमती सामानही ठेवू शकता.
तिजोरीच्या वर कधीही हलके अथवा जड कोणतेही सामान ठेवू नये. असे करणे अतिशय अशुभ मानले जाते.तसेच तुटलेल्या गोष्टी कधीही ठेवू नका.
तिजोरीमध्ये बेकार वस्तू कधीही ठेवू नका. असे केल्याने निगेटिव्हिटीवर परिणाम होतो. यामुळे कुटुंबात त्रास निर्माण होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार धन तिजोरीच्या जवळ अथवा खाली कुठेही झाडू ठेवू नये. यामुळे पैशांची आवक कमी होऊ शकते.