ससून डॉकच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध

अधिवेशनाअगोदरच केली होती समस्यांची पाहणी


विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर


मुंबई : ‘मुंबईवर पहिला अधिकार कोळी समाजाचा, मच्छीमार बांधवांचा आहे, त्यामुळे कोणत्याही मच्छीमार बांधवाला हक्कांपासून वंचित आमचे शासन ठेवणार नाही. मी स्वतः ससून डॉक परिसरात जाऊन त्या भागातील स्थिती पाहिली आहे. मच्छीमार ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी गळणाऱ्या छपराचे नूतनीकरण केले आहे. पावसाळ्यात पाणी येणार नाही, असे छप्पर आता बांधण्यात आले आहे. आणखीन ऑक्शन हॉल, शौचालये नव्याने व दर्जेदार पद्धतीने बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ससून डॉक येथील कोळी व मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू’, असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री राणे यांनी विधान परिषदेत दिला.


विधान परिषदेत ससून डॉक संदर्भातील परिषद सदस्यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चेला उत्तर देताना मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी आमदार राजेश राठोड, आमदार चित्रा वाघ, आमदार शिवाजीराव गरजे, आमदार सचिन अहिर, यांनी लक्षवेधी मांडल्या. ससून डॉक परिसराला पूर्णपणे विकसित करून दर्जेदार सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


ससून डॉक परिसरातील मच्छीमारांच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळ व मत्स्य व्यवसाय विकास महामंडळामार्फत विकासकामे सुरू असून, यासाठी ९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यापैकी २२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे.

Comments
Add Comment

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या