मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ BEST च्या १३८ क्रमांकाच्या डबलडेकर बसला आग लागली. धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस रस्ताच्या कडेला थांबवली. प्रवासी, वाहक आणि चालक वेगाने बसमधून बाहेर पडले. बसमधून सर्वजण सुरक्षितरित्या बाहेर पडले आहेत. तातडीने अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाने बसच्या आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले. दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. बसला आग लागल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.