उत्तराखंडमध्ये जीप नदीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

डेहराडून: उत्तराखंडच्या पिथोरागड येथे आज,मंगळवारी जीप नदीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुवानीहून बोक्ता गावाकडे जात असताना हा अपघात झाला.


उत्तराखंडच्या पिथोरागड जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी जीप दुपारी 4 वाजेच्या सुमाराला नियंत्रण गमावून 150 मीटर खोल नदीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शाळकरी मुलीसह 4 महिलांचा समावेश आहे. तर 5 जण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण 13 प्रवासी होती. अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोककळा पसरली आणि स्थानिक लोकांनी प्रशासनासह तातडीने बचावकार्य सुरू केले.


जखमींना दरीतून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त जीप प्रवाशांना घेऊन मुवानीहून बक्ताकडे जात होती. जीप बक्तापासून थोड्या अंतरावर होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप खड्ड्यात उलटून नदीत पडली. सोनी पुलाजवळ हा अपघात झाला. नदीत कोसळल्याने जीपचा चुराडा झाला. जीप शेजारीच प्रवाशांचे मृतदेह पडले होते. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचाव पथकाने घटनास्थळावरून 8 मृतदेह बाहेर काढले. मृतांसोबत सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली जात आहे.


दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन आणि मदत आणि बचाव पथकांना बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे