मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची बैठक नुकतीच विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल यांच्या कार्यालयात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह हे होते आणि संचालन मुंबई मध्य विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अभयसिंह चौहान यांनी केले.
बैठकीच्या वेळी सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. या चर्चेत प्रामुख्याने उपनगरीय स्थानकांवरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, लिफ्ट आणि एस्केलेटर यासारख्या चांगल्या सुविधा सुरू करणे आणि प्रतीक्षा यादीतील तिकिटांचे व्यवस्थापन सुव्यवस्थित करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. उपनगरीय स्थानकांवर एस्केलेटरच्या तरतुदीसंदर्भातील एक उल्लेखनीय सूचनेला विभागीय प्रशासनाकडून त्याच्या संरचित, व्यावहारिक आणि दूरदर्शी दृष्टिकोनासाठी विशेष कौतुक मिळाले. समिती सदस्य आणि रेल्वे अधिकारी यांच्यातील फलदायी संवादाने बैठक सकारात्मक आणि रचनात्मकपणे संपन्न झाली. विभागीय रेल्वे प्रशासनाने सुविधांचे अपग्रेडेशन आणि प्राधान्याच्या आधारावर योग्य सूचनांच्या अंमलबजावणीसाठी आपल्या वचनबद्धतेचा
पुनरुच्चार केला.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार या बैठकीला व्यापार, वाणिज्य, उद्योग, कृषी, ग्राहक हक्क, दिव्यांग व्यक्ती, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांचा आणि व्यक्तींचा सक्रिय सहभाग दिसून आला. अरविंद रामलखन यादव, रामगोपाल शर्मा, निलेश श्याम शहा, अधिवक्ता मिलिंद बाळू कापडे, बैठकीला उपस्थित होत्या.