मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा जल्लोष साजरा केला.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला जोरदार सुरुवात झालेली बघायला मिळाली आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याचा आनंद सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत साजरा केला.
पुणे : पुण्यात १९३५ पासून असलेल्या कॅफे गुडलकचा बनमस्का प्रचंड लोकप्रिय होता. पण एका ग्राहकाने बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याची तक्रार केली तसेच ...
दरम्यान, आजच्या सभागृहात, विशेषतः विधान परिषदेत, विरोधी पक्षातील महायुतीच्या सदस्यांनी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून सरकारला जाब विचारण्याची आणि कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यामुळे सभागृहातील चर्चा तणावपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.