महसूल खात्यातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा

१२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती


मुंबई: महाराष्ट्रातील महसूल (Revenue) विभागातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या महसूल सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडरचा दर्जा देण्यात आल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली.  दरम्यान, १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या १२ नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

यासंदर्भात,  राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यादरम्यान, त्यांनी म्हंटले, "मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे."

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय, असेही त्यांनी म्हटले.


IAS पदोन्नती मिळालेल्या महसूल अधिकाऱ्यांची नावे 


विजयसिंह देशमुख
विजय भाकरे
त्रिगुण कुलकर्णी
गजानन पाटील
महेश पाटील
पंकज देवरे
मंजिरी मनोलकर
आशा पठाण
राजलक्ष्मी शहा
सोनाली मुळे
गजेंद्र बावणे
प्रतिभा इंगळे
Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध