सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई: २० लाखांच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या ३ तासांत अटक केली

सांगली: सांगली पोलिसांनी एका धाडसी दरोड्याचा छडा लावत अवघ्या तीन तासांत एका आरोपीला अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, भुईज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ जुलै रोजी पहाटे २:४३ ते ३:४५ दरम्यान घडलेल्या या घटनेत एका सराफ व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पोपट हासबे (रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) हे सराफ व्यापारी आपल्या साथीदारांसह जात असताना, ८ ते १० जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला आणि २० लाखांची रोकड लुटली. सातारा कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच, सांगली पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.


पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. पोहेकॉं उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना तासगावजवळ आरोपींच्या गाडीचा अपघात झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. अपघातानंतर दरोडेखोर डोंगराळ भागात पळून गेले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरात शोधमोहीम राबवली आणि विनीत राधाकृष्णन (वय ३०, रा. पलाकाठ, केरळ) नावाच्या एका आरोपीला लपलेल्या अवस्थेत पकडले.


आरोपी विनीत राधाकृष्णन याने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याचे साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर हायवेवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. पुढील तपास भुईज पोलीस करत आहेत. सांगली पोलिसांनी दाखवलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सांगलीत २४ वर्षीय तरुणाची हत्या, परिसरात भीतीचे वातावरण
सांगली, १२ जुलै २०२५: शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, वाल्मिकी आवास परिसरात एका २४ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कांबळे असे या मृत तरुणाचे नाव असून, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे