IND vs ENG: केएल राहुल बनला लॉर्ड्सच्या मैदानात एकापेक्षा अधिक शतक झळकवणारा दुसरा भारतीय खेळाडू

  96

लंडन : इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्सच्या मैदानात लोकेश राहुलनं आश्वासक खेळी करताना विक्रमी शतक साजरे केले आहे. लॉर्ड्सच्या मैदानात त्याच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे अन् विक्रमी शतक ठरले. इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानात एका पेक्षा अधिक शतक झळकवणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात राहुलनं १७७ चेंडूत १३ चौकाराच्या मदतीने इंग्लंडच्या मैदानातील चौथे अन् कसोटी कारकिर्दीतील १० शतक साजरे केले.


इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारतीय स्टार खेळाडूंपैकी एकालाही कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. फक्त दिलीप वेंगसरकर हे एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांनी इथं ३ शतकी खेळी करण्याचा पराक्रम करून दाखवलाय. त्यापाठोपाठ आता लोकेश राहुल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.


लॉर्ड्सच्या मैदानात कर्णधार शुबमन गिलसह यशस्वी जैस्वाल आणि करुण नायर हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परल्यावर लोकेश राहुलनं रिषभ पंतच्या साथीनं संघाच्या डावाला आकार दिला. लंचआधी त्याने पंतच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. लंच ब्रेकनंतर शतक साजरे केल्यावर लोकेश राहुल अन्य फलंदाजांसोबत मैदानात तग धरून थांबेल, अशी वाटत होती. इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजासमोर तो अगदी आरामात खेळताना दिसला. पण शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो फसला. शंभरीवरच तो हॅरी ब्रूकच्या हाती झेल देऊन बाद झाला.

Comments
Add Comment

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय