IND vs ENG: भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान, मात्र यशस्वी शून्यावरच बाद

  52

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताला विजयासाठी १९३ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरला या सामन्यात ४ विकेट मिळाल्या. तर बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. दरम्यान, भारताची सुरूवात खराब राहिली. सलामीवीर यशस्वी जायसवाल खाते न खोलताच बाद झाला.


इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही ३८७ धावांवरट आटोपला. म्हणजेच पहिल्या डावात दोन्ही संघ बरोबरीत होते. आता लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयासाठी १९३ धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा केवळ एक षटक खेळता आले. या षटकांत भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राऊली यांच्यात वादावादी झाली.



भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचे शतक


भारतीय संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शतक ठोकले. राहुलने १७७ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. राहुलचे कसोटी करिअरमधील हे दहावे शतक आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.


Comments
Add Comment

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक