‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

  40

मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी


पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होईल. महामार्गावरील घाटाचा भाग यामुळे टाळता येणार असून घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे.


Missing-Link-Project

या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदचा असून देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून याची उंची १८५ मीटर आहे. देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याही ठिकाणी बांधला गेला नाही. हा देखील एक विक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्यावतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार असून या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे.


महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक श्री. गायकवाड यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.

Comments
Add Comment

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे

पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं? मुंबईच्या दहीहंडी उत्सवातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई: राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला राजकीय रंगाचीही

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

घाटकोपर येथील दहीहंडीद्वारे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी सैनिकांच्या शौर्याला सलाम- देवेंद्र फडणवीस

मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर

‘दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’