ठाकूरवाडीच्या विद्यार्थ्यांची उपरोधिक मागणी: "चंद्रावर जाऊ, पण शाळेपर्यंत रस्ता द्या!"

पालघर: एकीकडे पालघर जिल्ह्यात हजारो कोटींचे प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि भव्य रस्ते आकाराला येत असताना, दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमधील ठाकूरवाडी येथील विद्यार्थ्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे. निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने, चिमुकल्या विद्यार्थ्यांना दररोज चिखल आणि पाण्याने भरलेल्या वाटेतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या विदारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सरकारला उपरोधिक मागणी केली आहे: "आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावरही जाऊ, पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या!"


ठाकूरवाडीतील जवळपास १५ ते २० विद्यार्थी दररोज निरगुडवाडी येथील शाळेत पायी जातात. हे अंतर १ ते दीड किलोमीटरच्या आसपास असल्याने येथे बससेवेचा प्रश्नच येत नाही, कारण जिथे चालण्यासाठीही धड रस्ता नाही, तिथे बस जाणे अशक्य आहे. त्यामुळे पाठीवर दप्तर घेऊन हे विद्यार्थी दररोज ये-जा करतात.


मात्र, पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल होतो. या चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. अनेकदा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना भिंतीवरून उड्या मारून जावे लागते. नुकतीच एका विद्यार्थ्याचा उडी मारताना पडल्याची घटनाही ग्रामस्थांनी सांगितली.


या बिकट परिस्थितीमुळे पालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना आपली कामे सोडून त्यांच्यासोबत जावे लागते. "रस्ता चांगला केला तर एखादी गाडी किंवा मुले चालतही कोणत्याही अडचणीशिवाय जाऊ शकतील," असे एका ग्रामस्थाने सांगितले.


जर हीच परिस्थिती राहिली, तर पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा इशाराही संतप्त पालकांनी दिला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असे ते म्हणाले. अन्यथा, बांधकाम विभागाच्या कार्यालयातच शाळा भरवू, असेही त्यांनी उपरोधिकपणे सुनावले आहे.


जिल्ह्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांची ही व्यथा प्रशासनासाठी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. या चिमुकल्यांच्या शिक्षणाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे