मोहित सोमण: गेल्या आठवड्यात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. बाजारातील उतरती कळा, गुंतवणूकदारांची नाउमेद, नव गुंतवणूकदारांमध्ये घटलेला उत्साह या सगळ्याचा परिपाक म्हणजे शेअर बाजारात घसरण झाली. संपूर्ण आठवड्यात शेअर बाजारात युएसकडून होणारी टेरिफ वाढ या मुद्यांभोवतीच बाजार फिरला. अंतिमतः निफ्टी, सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात घसरला होता. गेल्या तीन दिवसात बीएसई सेन्सेक्स १.१२% व निफ्टी साधारण १.१५% घसरला आहे. संपूर्ण महिनाभरात मात्र सेन्सेक्स १.०%, निफ्टीत १.०५% वाढ झाली आहे. यातूनच बाजारातील अस्थिरतेवर प्रकाश पडतो. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० पातळी २५५४४ पातळीवर पोहोचली होती तर गेल्या महिन्याभरात ती पातळी २५६३७ अंकांची सर्वोच्च पातळी गाठली मात्र शुक्रवारी निफ्टी पातळी आदल्या दिवशीचा २५३५५.२५ अंगावरून घसरत २५१४९.८५ अंकावर स्थिरावला आहे. कालचा निफ्टी सर्वोच्च पातळी २५३२२.४५ होती.
सेन्सेक्सने गेल्या महिन्याभरात ८४०५८.९० अंकांची सर्वोच्च पातळी (All time high) पाहिली असली तरी गेल्या आठवड्याभरात पुन्हा सेन्सेक्स १.११% घसरत ८३७६४.२२ या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. सेन्सेक्स बँक निर्देशांकातही गेल्या महिन्याभरात ०.१५% घसरण झाली असून गेल्या आठवड्यात ०.१५% घसरण झाली आहे. बँक निफ्टी गेल्या महिन्याभरात ०.४१% वाढला असून मागील आठवड्यात ०.३२% घसरला आहे. भारतीय अस्थिरता निर्देशांकात (Indian Volatility Index VIX) संपूर्ण महिनाभरात ८.९९% घसरला आहे. मागील आठवड्यात हा ७.३४% घसरला असून कालच्या अखेरच्या सत्रात तो ३.९३% उसळला आहे. गेल्या सहा महिन्यांत अस्थिरता निर्देशांक १४.५६% घसरला आहे. यातूनच बाजारातील मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली आहे.
जागतिक पातळीवरील प्रथम रशिया युक्रेन युद्ध, रेड सी प्रकरण, त्यानंतर इस्त्राईल इराण युद्ध अशा विविध पातळ्यांवरून बाजारात मोठी हालचाल होत होती. भारतातील अर्थव्यवस्था मजबूत असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची रोख खरेदी,विक्री हा बाजारातील चिंतेचा विषय होता. या सगळ्या घटनांमुळे संपूर्ण महिनाभरात बीएसईत (BSE) एफआयआयने (Foreign Institutional Investors FII) कडून एकूण २११३.४० कोटींची रोख विक्री झाली असून घरगुती गुंतवणूकदार (Domestic Institutional Investors DII) यांच्याकडून एकूण रोख खरेदी ३०८११.६६ कोटींची राहिली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बीएसईत १८% टक्के रोख विक्रीत घट झाली आहे. एनएसईत (NSE) शुक्रवारी घरगुती गुंतवणूकदारांनी ३४७२.९५ कोटींची निव्वळ खरेदी केली असून परदेशी गुंतवणूकदारांनी ५१५५.६८ कोटींची विक्री केलीआहे. जुलैपर्यंत एनएसईत (NSE) परदेशी गुंतवणूकदारांनी १०२७४ कोटींची रोख निव्वळ विक्री केली असून घरगुती गुंतवणूकदारांनी १२४०२ कोटींची निव्वळ खरेदी केली होती. यातू़न बाजारातील अस्थिरतेचा फटका ब्लू चिप्स (Blue Chip) कंपन्यांसोबत इतर मिडकॅप व स्मॉलकॅप मध्येही बसला होता. बीएससी मिडकॅप आठवड्यात १.०९% कोसळला असून संपूर्ण महिनाभरात तो १.२०% कोसळला होता. बीएसई स्मॉलकॅपमध्ये आठवड्यात ०.७०% घसरण झाली, महिन्यात ०. ०७% वाढ झाली आहे व एनएसईत गेल्या आठवड्यात १.२३% घसरण झाली तर गेल्या महिन्याभरात १.३४% वाढ झाली आहे.यासगळ्या परिस्थितीत पाहिल्यास संपूर्ण महिनाभरात १ ते २% अस्थिरता कायम राहिल्याने बाजारमूल्यात मोठ्या प्रमाणात चढउतार आली. अंतिमतः किरकोळ गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान झाले. आता गेल्या आठवड्यात सोन्याच्या व चांदीच्या दरातही वाढ झाल्याने बाजारातील सपोर्ट लेवल ढळली तरी मजबूत फंडामेंटल मुळे जागतिक नुकसानाचा प्रमाणात बाजार स्थिर होते.
पुढील आठवड्यात बाजार कसे राहिल?
बाजार कसे राहील हे सांगणे कठीण असले तरी काही मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 'दलाल स्ट्रीट' आठवड्यात मोठ्या संख्येने घसरला व परदेशी गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक काढून घेतली होती. निर्देशांकांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली. गुरुवारपर्यंत, गेल्या काही दिवसांत बाजारासाठी ही श्रेणी नाजूक होती कारण बाजारासाठी कोणतेही नवीन ट्रिगर्स नव्हते आणि संस्थात्मक पाठिंब्याचा अभाव होता जो बाजारात आवश्यक असतो. म्हणून ब्लॉकडीलच्या संस्थात्मक डेटावर नजर टाकली तर परदेशी संस्था आणि देशांतर्गत संस्था दोन्ही संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून फारसा सहभाग दिसून येत नाही.शुक्रवारी टीसीएसच्या निराशाजनक कमाईनंतर निफ्टी २०० अंकांनी खाली आला होता ज्याचा फटका अनेक कंपन्यांच्या बाजार भांडवलात बसला आहे.
आगामी काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशावर १०% अतिरिक्त कर लावण्याची धमकी दिल्यानंतर आता त्याचे पडसाद भारतातही उमटत आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉलरही रूपयांच्या तुलनेत वाढत आहे. कच्च्या तेलाच्या (Crude)निर्देशांकात २% वाढ झाली आहे. सोन्यात प्रति ग्रॅम ३ दिवसात सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली. औद्योगिक मागणीमुळे चांदीही महागली होती. अमेरिकन बाजारातील बेरोजगारी आकडेवारी अनपेक्षित आल्यामुळे डॉलर आणखी उसळत आहे. अशा परिस्थितीत आजच भारताचे परकीय चलन ३.०५ अब्ज डॉलर्सने घसरले. मात्र सोन्याच्या परकीय साठ्यात मात्र ३४२ दशलक्ष डॉलर्सने वाढ झाली होती. यामुळे गुंतवणूकीतील परिस्थिती बघता आताच कुठल्याही क्षेत्रातील ठोस ट्रिगर(Triggers) मिळाले नाहीत. क्षेत्रीय विशेष निर्देशांकातही ही अस्थिरता कायम आहे, तिमाहीचे आकडेवारी संमिश्र आल्याने आगामी काळात पहिल्या तिमाहीतील नवीन आकडेवारी जाणून घेण्यासाठी बाजार उत्सूक आहे.
बाजारातील हालचाली वाढत असताना भूराजकीय कठिणाईचा सामनाही देशाला करावा लागत आहे.दुसरीकडे बहुतांश तज्ञांनी मत व्यक्त केल्यानुसार, बाजाराचे लक्ष तिमाही उत्पन्नाकडे आहे कारण सामान्यतः उत्पन्न कसे होईल याची चिंता गुंतवणूकदारांना असते आणि एकदा कंपन्या त्यांचे उत्पन्न जाहीर करतात तेव्हा ते बाजारासाठी पुढील दिशा स्पष्ट करू शकतात.' यामुळे बाजारातील भाकीत करणे कठीण ठरेल. सापेक्ष आधारावर, गेल्या काही दिवसांत व्यापक बाजार (Large Canvas) मध्ये प्रत्यक्षात चांगली कामगिरी करत आहे. निर्देशांकात ते दिसून येत नाही परंतु अनेक समभागांनी (Shares) ने चांगली कामगिरी केली होती. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मात्र तेजीचा अभाव दिसून येत आहे. आगामी आठवड्याची दिशा अनेक मुद्यांवर अवलंबून असेल ज्यात तेलाचा,सोन्याचा, टेरिफ, मेटल, व आयटीचा प्रश्न समाविष्ट असू शकतो.
टेरिफबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना विविध वक्तव्ये केली होती व आपल्या भूमिकाही बदलल्या होत्या. आता ९ जुलैऐवजी १ ऑगस्ट ही तारीख अंतिम मुदत म्हणून शुल्क सवलतीसाठी दिली आहे.अजूनही युके वगळता इतर देशांशी अधिकृत टेरिफ (Tariff Deal) डील झालेले नाही.अनेक देशांना लक्ष्य करून नवीन टॅरिफ इशारे देखील दिले असले किंवा पत्र पाठवली असली तरी अजून इतर देशाशी अधिकृत डील ट्रम्प यांनी केली नाहीत. याशिवाय १ ऑगस्टपासून कॅनडामधून येणाऱ्या निवडक आयातीवर ३५% आणि तांब्याच्या आयातीवर ५०% टॅरिफची घोषणा नुकतीच ट्रम्प प्रशासनाने केली आहे. आता भारत युएस प्रशासनाशी तडजोड करत टेरिफ २०% पेक्षा कमी असावे यासाठी उच्चस्तरीय बोलणी करत आहे. ९ जुलैची अंतिम मुदत संपूनही भारताला अद्याप अशा कोणत्याही वाढीचा सामना करावा लागलेला नाही आणि असे मानले जाते की दोन्ही देशांमधील व्यापार वाटाघाटींना 'हिरवा'कंदील मिळेल कारण हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या 'भारताशी करार करण्याच्या जवळ आहोत' या विधानाशी ते सुसंगत होते.
मागील आठवड्यातील बाजाराची परिस्थिती कशी असू शकते? काय आहे तज्ञांचे मत ?
१) ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे - सध्याचा बाजाराचा काळ हा संपूर्णपणे डोनाल्ड ट्रम्प यांना अर्पण केलेला आहे. त्यांची मुदत ३० जुलैला संपते आहे. तोपर्यंत किती देश टेरिफचे करारनामे करतील त्यावर ट्रम्प यांचे भवितव्य अवलंबून असेल.अंदाजे १९० देशांपैकी केवळ १४-१५ देशांनी टेरिफ करारनामा केलेला आहे.जर इतर 175 देशांनी करार केले नाहीत,तर काय होईल? एक तर अमेरिकेशी कोणीही व्यापार करायला उत्सुक नाही. हे एक सिद्ध होईल.दुसरी महत्वाची गोष्ट अमेरिकेत वस्तुंचा तुटवडा प्रचंड होई ल. आणि महागाई कंट्रोलच्या बाहेर जाईल. पण तरीदेखील कोणतेही इतर देश पुरवठा पुर्रवत करू शकणार नाहीत. सप्लाय चेन जागतिक पातळीवर तुटल्यावर काय घडू शकतं हे आपण कोरोना कालात अनुभवलं आहे. ते अमेरिका परत एकदा अनुभवेल हेनि श्चित आणि जसा दोन महिन्यापुर्वी जनआक्रोश रस्त्यावर एलन मस्क व ट्रम्प यांच्या विरोधात उतरला होता तीच परिस्थिती परत एकदा अनुभवेल असं एकंदरीत चित्र आहे. इतर देश जे अमेरिकेला निर्यात करीत होते ते तेच उत्पादन इतर देशांना करण्याचा प्रयत्न करतील, त्याचा परिणाम म्हणून अनेक देश एकत्रित येतील. त्याला खंडांच्या मर्यादा रहाणार नाहीत. त्याचा फायदा हा प्रत्येक देशाला हळूहळू होईल. जग अमेरिकन दहशतीतून सुटकेचा श्वास घेईल अशीही शक्यता असेल. अमेरिका पुर्णपणे वाळीत टाकल्यासार खी होईल किंवा जुलै २७-२८ तारखेला टेरिफ नाट्यांवर पडदा पडेल किंवा ट्रम्पना पायउतार व्हावे लागेल. इकडे ब्रिक्स देश युपीआय वापरून व्यापार करतील किंवा वेगळी व्यवस्था असेल, पण ट्रम्पच्या टेरिफमुळे उरलेलं जग जास्त विश्वासाने जवळ येत आहे हे नक्की.आज ब्रिक्स देशांची ट्रम्पने एवढी धास्ती घेतली आहे की त्या देशांवर वेगळा १०% टेरिफ यातून अमेरिकेची भीती स्पष्ट होत आहे.
आज मेडीसीन/फार्मा वर २००% टेरिफ लावण्यात येणार आहे जे तसंच्या तसं अमेरिकेतील जनतेवर पास ऑन होईल. फार्मा क्षेत्रात ही भारत दादाच आहे याचीही जाणीव परत एकदा जगाला होऊ देत. थोडक्यात अमेरिकेचे इतर देशांवरील वर्चस्व कमी झालं आहे हेच खरं... आज शस्त्र सामग्रीकरता भारतासारखा विश्वास व टेक्नॉलॉजी परिपूर्ण देश अमेरिकेला आव्हान देत आहे. एफ ३५ विमानाला आज एक महिना केरलामध्ये जाग्यावर उभा करून इंग्लंड व अमेरिकेला त्यांच्या मर्यादा जगासमोर आणत भारताची युद्धाची व शस्त्र सामग्रीची ताकद जगासमोर आणत आहे.व त्याच बरोबर अमेरिकेला भारतात गुप्तहेर विमान पाठवण्याची वेळ आणली व नामुष्की करून घेण्याचीही वेळ भारताने अमेरिकेवर व इंग्लंडवर आणली आहे. त्या प्रकरणात ज्या अटीशर्ती भारताने दोन्ही देशाना घालत भारताने त्यांना अगतिक करून टाकणे हे विशेष आहे. डाॅलर हे चलन, टेरिफ चे प्रकरण लवकर संपले नाहीतर ५०% सुध्दा यापुढे वापरले जाणार नाही हे नक्की.थोडक्यात अमेरिकेला नमतं घेण्याची सवय नाहीये ती आता करून घेण्याची वेळ आली आहे हे नक्की.'
२) जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर - मागील आठवड्यात काय घडामोडी घडल्या व भविष्यात काय होऊ शकते यावर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की, 'जाग तिक व्यापार तणाव आणि उत्पन्न हंगामाची कमकुवत सुरुवात या दोन्ही काळात देशांतर्गत निर्देशांकांमध्ये सलग दोन आठवडे विक्री झाली. भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यातील विलंब आणि अमेरिकेने शुल्काची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने अल्पकालीन अनिश्चितता निर्माण झाली आहे. याव्यतिरिक्त,कॅनडावर ३५% शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे बाजारातील भावना आणखी कमकुवत झाल्या आहेत. एफएमसीजी आणि विवेकाधीन स्टॉकसारख्या उपभोगकेंद्रित क्षेत्रांनी निवडक खरेदी अनुभवली, ज्याला शहरी मागणी पुनरुज्जीवन आणि मार्जिन सुधारण्याच्या चिन्हे आहेत. महागाई कमी होण्याची पार्श्वभूमी, व्याजदरात घट आणि अनुकूल मान्सूनमुळे एकूण सकारात्मक परिणामांना हातभार लागला.सध्याच्या प्रीमियम मूल्यांक नांना टिकवून ठेवण्यासाठी ट्रिगर्सचा अभाव आणि प्रमुख आयटी बेलवेदरच्या निराशाजनक परिणामांमुळे व्यापक निर्देशांक नकारात्मक क्षेत्रात घसरले, ज्यामुळे आर्थिक वर्ष २६ च्या कमाईच्या अंदाजांवर चिंता निर्माण झाली. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील कमाई उघड होत असताना, गुंतवणूकदार मार्जिन आणि क्षेत्रीय गतिमानतेवरील मार्गदर्शनाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. अमेरिका आणि भारताकडून महागाईचे आकडे तसेच चीनच्या जीडीपीच्या आकड्यांसह आगामी आर्थिक डेटा रिलीझ गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतील अशी अपेक्षा आहे.'
३) मंदार भोजने - ज्येष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक चॉईस इक्विटी प्रायव्हेट लिमिटेड -
निफ्टीमध्ये व बँक निफ्टीत गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीवर चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ज्येष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,'टीसीएस कमाईनंतर आयटी शेअर्समधील कमकुवतपणा आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रा ध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ टिप्पण्यांनंतर संभाव्य जागतिक व्यापार व्यत्ययाबद्दलच्या चिंतेमुळे ११ जुलै रोजी बेंचमार्क निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात त्यांची घसरण सुरू ठेवली. निफ्टी ५० आठवड्यात २५,१४९.८५ वर बंद झाला, २०५ अंकांनी किंवा ०.८१% ने घसरून, २५,३३० च्या जवळील महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्र ओलांडले.तांत्रिकदृष्ट्या,निफ्टी दैनिक चार्टवरील त्याच्या मागील स्विंग नीचांकीपेक्षा खाली आला आहे, जो दर्शवितो की निर्देशांक उच्च पातळींवरून अल्पकालीन सुधारात्मक टप्प्यातून जात आहे. किंमत आता २५,००० च्या जवळील प्रमुख फिबोनाची समर्थन क्षेत्राजवळ (Support Level)येत आहे, जिथे उलट सिग्नल येऊ शकतो, कारण व्यापक ट्रेंड तेजीत आहे.
मोमेंटम निर्देशक कमकुवत भावना दर्शवितात. आरएसआय (Relative Strength Index RSI) ४८.७५ वर आहे आणि खाली ट्रेंड करत आहे, तर एमएसीडीने (Moving Average Convergence and Diversion MACD) नकारात्मक क्रॉसओवर दिला आहे, दोन्ही सावधगिरी दर्शवितात.२५,३३० अकांच्या वर बंद झाल्यास तेजीची गती पुन्हा सुरू होऊ शकते, संभाव्यतः २५६७०-२६००० ला लक्ष्य केले जाऊ शकते. नकारात्मक बाजूने, जर २५००० निर्णायकपणे तुटला, तर पुढचा आधार (Support) २४७५० वर असेल.'
आधार पातळी (Support Level) : २५१००-२५०००
प्रतिरोध पातळी (Resistance Level): २५३००-२५६००
एकूणच पक्षपात (Overall Bias) : 'बाजूला' (Sideways)
आठवड्यातील बँक निफ्टी कामगिरीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ तंत्रज्ञान व डेरिएटिव विश्लेषक मंदार भोजने म्हणाले की,' बँक निफ्टी निर्देशांक ५६७५४.७० अंकावर बंद झाला, जो मागील आठवड्याच्या बंदपेक्षा ०.४९% कमी होता. आठवड्याचा चार्ट उच्च पातळीवर नकार दर्शवितो, कारण निर्देशांक ५७००० अंकांच्या महत्त्वपूर्ण पातळीपेक्षा जास्त टिकू शकला नाही. हा विक्रीचा दबाव चालू असलेल्या वाढीच्या ट्रेंडमध्ये संभाव्य विराम दर्शवितो, जो जवळच्या काळात मंदीच्या किंवा एकत्रीकरणाच्या टप्प्याकडे निर्देश करतो.
या आठवड्यात, बँक निफ्टी निर्देशांकाने एक लांब वरची विक आणि थोडी कमी विक असलेली मंदीची मेणबत्ती तयार केली, ज्याला सातत्यपूर्ण ट्रेडिंग व्हॉल्यूमचा आधार मिळाला. हे उच्च पातळीवर सतत विक्रीचा दबाव आणि मर्यादित खरेदी व्याज दर्शवते, जे जवळच्या काळात एकत्रीकरण किंवा सौम्य सुधारात्मक टप्प्याची शक्यता दर्शवते. जोपर्यंत निर्देशांक ५७५०० च्या खाली राहतो, तोपर्यंत "विक्री वाढ" धोरणाचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये ५६५०० आणि ५६००० वर डाउनसाइड लक्ष्य ठेवले जाते.आठवड्याच्या कालावधीत, बँक निफ्टी त्याच्या सर्व प्रमुख मूव्हिंग सरासरींपेक्षा जास्त व्यवहार करत आहे, ज्यामध्ये अल्पकालीन २० दिवस, मध्यमकालीन ५०-दिवस आणि दीर्घकालीन २००-दिवसांच्या घातांकीय मूव्हिंग सरासरी (Exponential Moving Average EMA) यांचा समावेश आहे, जे एकूणच वाढीचा ट्रेंड दर्शविते.तथापि, उच्च पातळीवर विक्रीचा दबाव आणि ५७००० च्या महत्त्वपूर्ण पातळीपेक्षा जास्त टिकून राहण्यास असमर्थता दर्शविते की निर्देशांक एकत्रीकरण टप्प्यात प्रवेश करत आहे. प्रमुख नकारात्मक बाजू ५६५००-५६००० श्रेणीमध्ये ठेवली आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) ६३.८३ वर आहे, जो बाजूला गती दर्शवितो. या एकत्रीकरण टप्प्यामुळे निर्देशांक त्याच्या पुढील दिशात्मक हालचालीसाठी नवीन ट्रिगर्सची वाट पाहत असल्याने वेळनिहाय किंवा किंमतनिहाय सुधारणा होऊ शकते.
बँक निफ्टी निर्देशांकाला ५७०००-५७५०० श्रेणीत लक्षणीय प्रतिकाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जर निर्देशांक वर जात राहिला तर खाजगी बँकिंग क्षेत्रातील कोटक बँक वाढीच्या ट्रेंडला पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रात, एसबीआयएन (SBIN) ताकद दाखवेल आणि कोणत्याही संभाव्य वाढीस हातभार लावेल अशी अपेक्षा आहे. चालू समाप्तीसाठी, पुट ऑप्शन्स ५६५०० आणि ५६००० स्ट्राइकच्या जवळ सर्वाधिक एकाग्रता दर्शवितात, जे त्यांना प्रमुख समर्थन पातळी म्हणून चिन्हांकित करतात. उलट, ५७००० आणि ५७५०० वर कॉल ऑप्शन्समध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट संभाव्य प्रतिकार दर्शवितो, जो आगामी सत्रांमध्ये ५६०००-५७५०० ची संभाव्य ट्रेडिंग श्रेणी सूचित करतो. व्यापाऱ्यांना सावध राहण्याचा, विक्रीवर वाढीचा दृष्टिकोन विचारात घेण्याचा आणि चालू बाजारातील अस्थिरता आणि संभाव्य किंमतीतील चढउतारांमध्ये प्रभावीपणे जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी कठोर स्टॉप-लॉस पातळी राखण्याचा सल्ला दिला जातो.'
सपोर्ट (Support Level) : ५६५००-५६०००
प्रतिरोध (Resistance Level) : ५७०००-५७५००
पक्षपाती (Overall Bias) - 'बाजूला' (Sideways)
यामुळेच येणार आठवडा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा ठरू शकतो. जागतिक निर्देशांकात हालचाल ही सोमवारी गिफ्ट निफ्टीत परिवर्तित होईलच तत्पूर्वी मायक्रोलेवला टेक्निकल चार्ट व फंडामेंटल यांचा एकत्रित अभ्यास केल्यास गुंतवणुकदारांना त्याचा निश्चि तच फायदा होईल.