पुणे-नाशिक या प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत चांगली बातमी आहे. पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी हालचालींना गती आलीयं. मध्य रेल्वेने या रेल्वे मार्गाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर पूर्ण केलाय. हा अहवालही अंतिम टप्प्यात आहे. काही त्रुटी दूर झाल्यानंतर लवकरच तो मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग प्रति तास २०० किलोमीटर वेगाने धावण्यासाठी सक्षम असेल. प्रकल्पाची अंमलबजावणी साडेतीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण २४ स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक या महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसेचं नवीन मार्गिकेमुळे पुणे-नाशिक पट्ट्यातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.
'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी तयार झाले राज्याचे जनसुरक्षा ...
स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधी जुन्या पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाची मागणी करत होते. असे असतानाच या नवीन मार्गाचा प्रकल्प अहवाल पूर्णत्वास आला आहे. या निर्णयामुळे पुणे आणि नाशिकदरम्यानच्या रेल्वे प्रवासाच्या नियोजनात मोठा बदल अपेक्षित आहे. या नवीन मार्गाची संकल्पना जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडली होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद इंथं जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पामुळं जुन्या प्रस्तावित रेल्वे मार्गात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळं या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी नवीन मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिलीयं.