Chatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण! शिवनेरी ते जिंजी...राज्यातील १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. महाराजांच्या कोणत्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे ते जाणून घ्या...



शिवनेरी



महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे.



राजगड



राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं जातं. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला.



प्रतापगड




येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठं स्थान आहे.




पन्हाळा




महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक किल्ल्याला एक इतिहास आहे. शिवा काशीद आणि बाजीप्रभूंच्या बलिादानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला.



रायगड




स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ल्यात शिवराज्याभिषेक झाला.

साल्हेर




एक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला.



लोहगड



पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ लोहगड किल्ला आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक वास्तू आहेत.



खांदेरी




खांदेरी हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. इंग्रजांवर वचक बवण्यसाठी शिवाजी महाराजांनी या जलदुर्गाची निर्मिती केली.


सुवर्णदुर्ग



रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराच्या जवळ, हर्णे बंदरात, समुद्रातील एका बेटावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमारासाठी हा किल्ला बांधला.



विजयदुर्ग




मराठा साम्राज्याची पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, इंग्रजांपासून रक्षणासाठी उभारलेला होता. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे एक प्रमुख ठिकाण म्हणून विजयदुर्गला ओळखलं जातं.



सिंधुदुर्ग




छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली.



जिंजी



हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हणून जिंजी किल्ल्याची ओळख आहे.


Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद