पाच उत्पादने होणार भारतात लॉन्च -
टेस्ला आपली पाच उत्पादने भारतीय बाजारात आणू शकते. चीनमधील शांघाय शहरात ही उत्पादने (Manufacturing) बनवली जातील. माध्यमातील माहितीनुसार, या चारचाकीची किंमत २.७७ मिलियन (दशलक्ष) रूपये असू शकते. भा रतात सध्या आयात केलेल्या संपूर्ण चारचाकीवर ७०% टेरिफ लागू आहे. त्यामुळे ही कार महागडी ठरू शकेल. भारतासारख्या 'प्राईज सेनसेटिव' बाजारात महागडी टेस्ला किती चालेल हे येणारा काळच ठरवील.अमेरिकेत त्याच मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ४४,९९० डॉलर आहे ती कर क्रेडिट लागू झाल्यानंतर ३७,४९० डॉलरला युएस बाजारात विकली जाते. भारतात या गाडीची किंमत ३१९८८ डॉलर असू शकते.
आणखी कुठे उघडणार?
भारतात मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीची वर्णी लागू शकते. भारतात मुंबईनंतर दिल्लीत टेस्लाचे दुसरे शोरूम उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा माध्यमांना दिलेल्या निमंत्रणात, कंपनीने म्हटले आहे की '१५ जुलैचा कार्यक्रम हा शहरातील आघाडीच्या व्यावसायिक व्यवसाय जिल्ह्यात असलेल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्ला अनुभव केंद्राच्या उद्घाटनाद्वारे भारतात टेस्लाचा शुभारंभ होणार आहे.'
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून टेस्लाला आकर्षित व भारतात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले होते. ज्यामध्ये टेस्लासाठी स्थानिक पातळीवर ईव्ही कार उत्पादन करण्यासाठी एक नवीन संरचनात्मक धोरण तयार करणे समाविष्ट होते. मात्र टेस्लाने सध्या भारतात कार उत्पादन करण्याचा विचार नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी मस्कने भारताला भेट देण्याची योजना आखली होती जिथे ते स्थानिक ईव्ही उत्पादनासह २अब्ज ते ३ अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा करणार होते. परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी हा दौरा रद्द केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,' जर टेस्लाने त्या देशाच्या शुल्कांना टाळण्यासाठी भारतात कारखाना बांधला तर ते अमेरिकेसाठी अन्याय्य ठरेल.' अशाप्रकारे ट्रम्प यांनी टेस्लाबाबत नाराजी बोलून दाखवली होती.
नुकतेच टेस्लाने या वर्षाच्या सुरुवातीला भारतात जाहिरात केलेल्या तीन डझन पदांपैकी अनेक पदांसाठी नियुक्ती केली आहे, ज्यामध्ये स्टोअर व्यवस्थापक, विक्री आणि सेवा अधिकारी यांचा समावेश आहे. ते त्यांच्या ऑटोपायलट महत्त्वा कांक्षेसाठी पुरवठा साखळी (Supply Chain) अभियंते आणि वाहन ऑपरेटर शोधत आहेत.