Jane Street: बाजाराला आणखी एक खळबळजनक पाचर ! जेन स्ट्रीट प्रकरण आणखी गुंतवणूकदारांचे नुकसान करणार? काय आहे नवी घडामोड जाणून घ्या

प्रतिनिधी: बाजारातील गुंतवणूकदार पुन्हा एकदा दबावाखाली येऊ शकतो. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर संपूर्ण बाजार ढवळून निघाले आहे.आता नव्या घडामोडी गुंतवणूकदारांचा आणखी चिंता वाढवणार आहेत.आरोपी जेन स्ट्रीटच कंपनीने निफ्टी ऑप्शन्समधील केलेल्या कथित घोटाळ्यनंतर आता या प्रकरणात नवे वळण लागले आहे. प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरवल्यानंतर पुन्हा एकदा बाजारात खळबळ माजली आहे. प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार नियामक सेबी (Security Exchange Board of India) मंडळाने अमेरिकेतील ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा विस्तार करेल अशी चर्चा बाजारात आहे. सेबी आता ही चौकशी आणखी तीव्र करू शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, निफ्टीखेरीज सेन्सेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्समधील कथित फेरफारचा समावेश करण्यासाठी चौकशीचा विस्तार केला जाईल असे सुत्रांनी प्रसारमाध्यमां ना सांगितले होते.

अनैतिक मार्गाने कृत्रिम नफा कमावल्याबद्दल भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने यापूर्वी जेन स्ट्रीट आणि त्यांच्याशी संबंधित तीन संस्थांना भारतीय बाजारपेठेत भाग घेण्यास बंदी घातली होती तसेच त्यांना ४८४३.५ कोटी रुपयांचे कथित बेकायदेशीर नफा जमा करण्याचे निर्देश दिले होते. सेबीने या कंपनीवर निफ्टी ५० आणि बँक निफ्टी सारख्या बेंचमार्क निर्देशांकांमध्ये एक्सपायरी डेजवर फेरफार केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या बँक खात्यांवर कारवाई केली होती. याच पार्श्वभूमीवर आता, बीएसई निर्देशांकांत काही फेरफार केली आहे का याची तपासणी सेबीने सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी कुठल्याही गैरव्यवहारांना खपवून घेणार नाही त्यावर कडक कारवाई केलीच जाईल असे कडक संकेत दिले होते. त्यानुसार सेबीतील सुत्रे हालत असल्याची चर्चा आहे.

ताज्या अहवालानुसार, सेबीची चौकशी आता एनएसई निर्देशांकांच्या पलीकडे जाईल आणि बीएसईच्या निर्देशांक व्यतिरिक्त ज्यांनी गेल्या दोन आर्थिक वर्षांत डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग क्रियाकलापांमध्ये तीव्र वाढ पाहिली आहे अशा सगळ्या व्यापार क्रियांचा तपास सेबी करू शकते.जेन स्ट्रीटचा अनैतिक मार्गाने कमावलेला ३६,६७१ कोटी रुपयांचा नफा पूर्णपणे सेबीचा रडारवर होता. सेबीने यापूर्वी म्हटले होते की जेन स्ट्रीटने जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान भारताच्या डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेत फेरफार करून ३६,६७१ कोटी रुपयांचा नफा कथितपणे कमावला आहे. तथापि, जेन स्ट्रीटने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सेबीने आपल्या अंतरिम आदेशात संशयित उल्लंघनांचे 'अभूतपूर्व प्रमाण आणि गुंतागुंत' अशा शब्दांत या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. याशिवाय सखोल चौकशीसाठी आणखी काही काळ जाऊ शकतो. बाजाराच्या अखंडतेला कधीही भरून न येणारे नुकसान टाळण्यासाठी अंतरिम उपाययोजना आवश्यक आहेत असे सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये नेमके म्हटले आहे की, 'जर आता अंतरिम निर्देश दिले गेले नाहीत आणि सखोल चौकशीनंतर असे दिसून आले की प्रत्यक्षात बेकायदेशीर नफा झाला होता जो वळवण्यात आला होता, तर बाजाराच्या अखंडतेला, गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला, गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेल्याने यावर भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी अंतरिम योजना बनवणे आवश्यक आहे.' असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’