gold silver marathi news: सोन्यात सलग तिसऱ्यांदा वाढ ! चांदीत तीन आठवड्यानंतर मोठी उसळी! 'ही' आहेत वाढीमागील कारणे !

प्रतिनिधी: सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात तुफानी आली आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरातही जबरदस्त वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील भूराजकीय (Geopolitical) दबावामुळे बाजारातील सोन्याचांदीच्या सपोर्ट लेवलमध्ये घसरण झाल्याने बाजारातील सोन्याचांदी निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स ' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ६० रूपयाने, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ५५ रूपये तर १८ कॅरेट प्रतिग्रॅम दर ४५ रूपयांनी वधारला आहे. पर्यायाने २४ कॅरेट प्रति ग्रॅमचे दर ९९००, २२ कॅरेटचा प्रति ग्रॅम दर ९०७५ रूपये, १८ कॅरेट प्रति ग्रॅम दर ७४२५ रूपयांवर सराफाबाजारात संध्याकाळपर्यंत स्थिरावला आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ६०० रूपयांनी वाढल्याने दरपातळी ९९००० रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ५५० रूपयांनी वाढल्याने दरपातळी ९०८५० रूपयांवर पोहोचली,१८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४५० रुपयांने वाढल्याने ७४२५० रूपयांवर पोहोचली आहे. एकूणच बाजारातील सोन्यावर दबाव आशिया बाजारातही जाणवला होता.


जागतिक स्तरावरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये १.०३% इतक्या मोठ्या संख्येने वाढ संध्याकाळपर्यंत झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३% इतकी भरघोस वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजार एमसीएक्समधील (Multi Commodity Exchange) सोन्याच्या निर्देशांकात ०.९०% वाढ झाल्याने सोन्याची एमसीएक्सवरील प्रतितोळा दरपातळी ९७५५८.०० रूपयांवर पोहोचली आहे. विशेषतः मध्यपूर्वेकडील इराण - इस्त्राईल युद्धानंतर सोने दोन आठवडे घसरत कमी दरावर स्थिरावले मात्र मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी चढउतार झाली होती. आता ट्रम्प यांच्या टेरिफ मुद्यांवर सोन्यावर दबाव निर्माण झाला. अमेरिकन बाजारातील टेरिफमधून वाढीव अपेक्षित महसूलामुळे आज डॉलर मजबूत झाला. अंतिमतः सोन्याच्या मागणीबरोबरच सोन्याच्या मूल्यांकतही वाढ झाली आहे. अमेरिकेचे जीडीपी आकडेवारी अपेक्षित असताना ग्राहकांनी बाजारातील गुंतवणूकीपेक्षा सोन्याच्या नफा बुकिंग केल्याची शक्यता असल्याने परवापर्यंत सोन्यात घसरण झाली होती. मात्र पुन्हा एकदा साठा घटून मागणी वाढल्याने दर महागले आहेत.


चांदीच्या दरातही मोठ्या विश्रांतीनंतर तुफानी -


चांदीच्या तीन आठवडे आकडेवारी स्थिरावल्यानंतर आज चांदीनेही मोठी उसळी घेतली आहे. प्रामुख्याने टेरिफ शुल्कवाढीचा भीतीने चांदीच्या उत्पादनात साशंकता निर्माण झाल्याने दर महागले आहेत. याशिवाय औद्योगिक उत्पादनात वाढलेल्या मागणीचाही परिणाम बाजारावर झाला. जागतिक पातळीवर चांदीच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.आंतरराष्ट्रीय सिल्वर फ्युचर निर्देशांकात (Silver Future Index) यामध्ये संध्याकाळपर्यंत २.९७% वाढ झाल्याने दोन आठवड्यातील चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. ए मसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.१६% वाढ झाल्याने चांदीची एमसीएक्सवरील दरपातळी १११४७६ रूपयावर पोहोचली आहे. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १ रूपये वाढ झा ल्याने चांदी दर १११ रुपये प्रति ग्रॅमवर कायम आहे. तर प्रति किलो किंमत थेट १००० रुपयांनी वाढल्याने चांदीची किंमत १११००० रूपयांवर पोहोचली आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक