शनिशिंगणापूर मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर: गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शनिशिंगणापूर मंदिराचा भ्रष्टाचार वाचला


मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि बाहेरची टीम पाठवून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले आहेत.



नेमका घोटाळा काय? मुख्यमंत्र्यांनी वाचला अहवाल!


आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत, शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये बनावट ॲप आणि पावत्या छापून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला, ज्यामुळे घोटाळ्याचे धक्कादायक आकडे समोर आले.




  • रुग्णालयात बाग नाही, पण कामावर माणसं दाखवली!

  • ३४७ अतिरिक्त कर्मचारी दाखवले (यापैकी कोणाचेही मस्टर नव्हते).

  • देणगी स्वीकारण्यासाठी ८ आणि तेल देण्यासाठी ४ काउंटर दाखवले, पण प्रत्यक्षात कर्मचारी कमी होते.

  • गाड्यांसाठी १६३ कर्मचारी दाखवले होते.

  • गोशाळा विभागात ८२ कर्मचारी दाखवले, त्यापैकी २६ कर्मचारी रात्री १ वाजल्यानंतर काम करत होते!

  • पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठीही कर्मचारी दाखवण्यात आले होते.

  • १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी दाखवले होते.

  • एकूण २ हजार ४७४ कर्मचारी कागदोपत्री दाखवले होते, पण प्रत्यक्षात त्यांची नोंदच नव्हती!


मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांना खाती उघडायला लावून मंदिरातील पैसे त्यांच्या खात्यात वळवले जात होते, असा अहवालात दावा आहे. पूजेच्या पैशासाठी नकली ॲप वापरले जात असल्याचेही समोर आले आहे.


या सर्व गंभीर आरोपांची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. राज्याच्या विधीमंडळाने कायदा पारित करून देवस्थानांसाठी समिती असण्याचा निर्णय घेतला असल्याने, यापुढे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर