Stock Market: शेअर बाजारात दबाव? ट्रम्प यांच्या आशियाई टेरिफ बॉम्बनंतर बाजारात मिळेल Support Level कशी असेल बाजाराची दिशा जाणून घ्या तज्ञांकडून..

  29

मोहित सोमण: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाल्यानंतरच नकारात्मक संकेत मिळाले‌ होते. त्याच मार्गावर बाजार पुढे गेल्याने सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स ११५ अंकाने व निफ्टी ५० (Nifty 50) ३६.६५ अंकाने घ सरला आहे. कालच रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर टेरिफवाढीचा नवा बॉम्ब टाकला आहे. ज्यामुळे आशियाई बाजारातही चिंतेचे वातावरण आहे. लवकरच भारतावर टेरिफची घोषणा होऊ शकते त्यामुळे भारतीय बाजारात अनास्था दिसत आहे. सकाळी सेन्सेक्स बँक निर्देशांकात ८४.३८ अंकांची वाढ झाली आहे. बँक निफ्टीत ७३.१० अंकाने वाढ झाली आहे. दोन दिवस घसरणीनंतर पुन्हा एकदा बाजारातील बँक निर्देशांकात झळाळी आली. प्रामुख्याने बँकेच्या यशस्वी तिमाहीतील परिणामांमुळे बाजारात वाढ अपेक्षित आहे.


सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१४%, ०.३२% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१८%,०.२३% वाढ झाली आहे. वीआयएक्स (VIX Volatility Index) अस्थिरता निर्देशांकात सकाळी १.०६% घसरण झाली. सकाळी निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये सकाळच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ मेटल (०.५३%), रिअल्टी (०.५०%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.१६%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.३४%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३०%) समभागात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक घसरण ऑटो (०.३५%), हेल्थकेअर (०.४५%), आयटी (०.३०%), मिडिया (०.२८%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.२५%) समभागात घसरण झाली आहे.


आज युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कालच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण आहे. विशेषतः मेटल, फार्मा क्षेत्रावर याचा फटका बसणे अपेक्षित होते. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी फिलिपाईन्स (२५%), ब्रुनेई (२५%),अलजि रिया (३०%), मोल्डोवा (२५%), इराक (३०%), लिबिया (३०%), श्रीलंका (३०%) शुल्कवाढ केल्यानंतर आशियाई बाजारातही नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी बाजारात दबाव कायम आहे. मात्र सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.२०%) शिवाय निकेयी २२५ (०.४१%) बाजारात घसरण झाली असली तरी स्ट्रेट टाईम्स (०.४१%), हेगसेंग (०.०९%), कोसपी (१.०१%), जकार्ता कंपोझिट (०.७७%), शांघाई कंपोझिट (०.३६%) बाजारात वाढ झाली आहे. काल अमेरिकन बाजाराती ल डाऊ जोन्स (०.२०%) घसरला होता. तर एस अँड पी ५०० (०.६१%), नासडाक (०.९४%) वाढला होता.


प्रामुख्याने आज ब्राझीलवर युएसने ५०% टेरिफ लावल्याने दोन्ही देशांना काही प्रमाणात नुकसान अपेक्षित आहे. मात्र आशियाई बाजारातील अनेक देशांत टेरिफ वाढ झाली असली तरी बँक ऑफ कोरियाने रेपो दर कायम ठेवल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण दिसले. भारताबाबत अजूनही निर्णय निश्चय न झाल्यामुळे त्यांचे पडसाद बाजारात उमटत आहेत.


सकाळच्या सत्रात सुरूवातीला कॅम्पस (६.७६%), युटीआय एएमसी (५.५६%), होम फर्स्ट फायनान्स (५.०२%), एसीएमई सोलार होल्डिंग्स (३.८५%), जेपी पॉवर वेंचर (३.१३%), वन ९७ (२.७६%), स्विगी (२.३४%), अनंत राज (२.०६%), कॅप्रिग्लोबल (१.०९%), नुवामा वेल्थ (१.७४%), लेमन ट्री हॉटेल (१.७७%), जिंदाल स्टील (१.१७%), एनटीपीसी ग्रीन (१.०५%), अदानी पॉवर (१.८८%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.४६%), आरईसी (१.२९%), इंटरग्लोब एव्हिएशन (१.०३%), इटर्नल (०.७२%), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (०.६६%), एक्सिस बँक (०.३९%), बजाज हाउसिंग फायनान्स (०.२३%) समभागात वाढ झाली आहे.


सकाळच्या सत्रात सुरूवातीला सर्वाधिक घसरण मेट्रोपोलिस हेल्थ‌‌‌ (४.३२%), झेन टेक्नॉलॉजी (२.०९%), भारत डायनॅमिक्स (२.०८%), झेन टेक्नॉलॉजी (२.०९%), जेएम फायनाशिंयल (१.५९%), इमामी (१.४९%), भारती एअरटेल (१.४४%), डेटा पॅटर्न (१.३४%), आयसीआयसीआय लोमबार्ड (१.३३%), हिताची एनर्जी (१.२३%), बीएसई (१.११%), एनटीपीसी (०.६४%), सिप्ला (१.५२%), इन्फो ऐज (१.५१%), अपोलो (१.३३%), एचसीएल टेक्नॉलॉजी (१.०७%), अंबुजा सिमेंट (१.० ६%), मदर्सन (०.५८%) या समभागात झाली आहे.


सकाळच्या बाजारातील हालचालीवर विश्लेषण करताना, जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,' बाजार गेल्या एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून ज्या अरुंद श्रेणीत व्यवहार करत आहे ती ओलांडण्याची शक्यता कमी आहे. जागतिक बाजारपेठेतील लवचिकता आणि भारतीय बाजारपेठेत सतत निधीचा प्रवाह यामुळे श्रेणीच्या खालच्या टोकाला असलेल्या बाजाराला आधार देण्याची क्षमता आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या सकारात्मक बातमीमुळे निफ्टी २५५०० च्या वरच्या श्रेणीतून स्पष्ट ब्रेक येऊ शकतो. परंतु बाजाराने हे अंशतः कमी केले आहे आणि म्हणूनच, निफ्टी २५५०० च्या पलीकडे तेजी टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नाही.


आजपासून निकालांचा हंगाम सुरू होत असल्याने निकालांच्या प्रतिसादात अनेक स्टॉक-विशिष्ट कृती होतील. आयटी क्षेत्राकडून अपेक्षा मर्यादित आहेत. तथापि, मिडकॅप आयटी चांगले निकाल आणि सकारात्मक भाष्य देण्याची शक्यता आहे. मजबूत बॅलन्स शीट आणि मुबलक तरलता (Liquidity) असूनही बँका कमी क्रेडिट वाढीशी झुंजत आहेत. बँकिंग विभागात चांगली क्रेडिट वाढ नोंदविणारेच चांगले कामगिरी करतील. ऑटोमध्ये एम अँड एम आणि आयशरमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले की,'आतापर्यंतच्या आठवड्यात, गती निर्देशकांकडून मिळालेल्या खराब सिग्नलमुळे,आम्ही उभ्या हालचालींचा अंदाज घेण्यापासून दूर राहिलो होतो. परंतु कालचे व्यवहार मागील दिवसाच्या मेणबत्तीमध्ये असल्याने, कदाचित ट्रेडिंग रेंजमध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, १५ मिनिटांच्या चार्टमध्ये उतरत्या विस्तारित वेज ब्रेकआउटची परिप क्वता (Maturity) दिसून येत आहे, ज्यामुळे वरच्या ब्रेकआउटच्या आशांना पाठिंबा मिळत आहे. असे म्हटले जाते की, २५५८८-६५० क्षेत्र (Zone) आव्हानात्मक राहील, परंतु ते देण्याची शक्यता जास्त असेल, ज्यामुळे २५७३०-८५० हे सुरु वातीचे वरचे लक्ष्य असेल आणि त्यानंतर २६२०० येईल. डाउनसाइड मार्कर २५४४० वर असेल जो २५३००-२४९२० ला उघड होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो.'

Comments
Add Comment

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

Jansurksha Bill : महाराष्ट्राला 'जनसुरक्षा कवच'

'शहरी नक्षलवादा'ला लगाम बसणार, १३ हजार सूचनांनी विधेयक तयार! जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर, तेरा हजार सूचनांनी

Tata Consultancy Services TCS Q1 Results: मोठी बातमी! बहुप्रतिक्षित टीसीएसचा निकाल जाहीर ! 'इतक्या' टक्क्याने निव्वळ नफ्यात वाढ महसूलात मात्र....

प्रतिनिधी: टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (Tata Consultancy and Services TCS) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित निकाल जाहीर केला आहे. कंपनीला

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित

मुंबई : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी

'कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या'

मुंबई : भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत