शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द, मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - रूपाली चाकणकर

  56

शहापूर: शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल, मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.


शहापूरच्या शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी आज शहापूर मध्ये पालकांची भेट घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यात जाऊन आतापर्यंतच्या तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.


पालकांचे म्हणणे तसेच शिक्षण विभाग, पोलिस तपासाचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, शिक्षणाधिकारी यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समिती केवळ रजिस्टर नोंद असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या गंभीर घटनेतील आरोपी मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आले आहे. तपासणी नंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र मान्यता रद्द झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तेव्हा सोमवार पासून स्वतंत्रपणे पुन्हा शाळा सुरू करणेबाबत कार्यवाही करावी अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


पोलिस आढावा बैठकीत, ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जण अटकेत आहेत. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित ३ जणांची पोलिस चौकशी करण्यात येत आहे असे पोलिसांनी सांगितले. दोन विश्वस्त यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र इतर दोन विश्वस्त यांनाही आरोपी करण्याची मागणी करत पालकांनी या आधी घडलेल्या काही घटना सांगितल्या आहेत. याबाबत उद्याच पोलिस, पालक, शिक्षण विभाग यांची बैठक घेऊन पालकांच्या तक्रारी जाणून घेत सखोल तपास करावा, अशा सूचना चाकणकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत. याप्रकरणी तपास जलद गतीने पुर्ण करत दोषारोपपत्र दाखल करण्याचे ही निर्देश त्यांनी दिले.


अपमानजनक शारीरिक तपासणीला सामोरे गेलेल्या मुलींच्या मानसिकतेचा विचार करून सर्व मुलींचे बाल कल्याण समितीकडून समुपदेशन करण्यात यावे असे ही चाकणकर यांनी प्रशासनास सांगितले.

Comments
Add Comment

श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

टोमॅटो, फ्लॉवरचे भाव दुप्पट, तर कोथिंबिरीचे दर घसरले पेण(स्वप्नील पाटील) : अवघ्या दोन आठवड्यांवर श्रवण महिना आला

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

गुरूपौर्णिमेच्या दिवशी घडली दुर्देवी घटना, भाविकांच्या वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

इगतपुरी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

कल्याणमध्ये पसरली डेंग्यू-मलेरियाची साथ

त्वरित उपाययोजना करण्याची मागणी कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत

Teacher Protest: शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य! २० टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा होणार

"अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे": गिरीश महाजन मुंबई: आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश