Operation Baam: पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानमधील १७ लष्करी तळांवर BLF चा हल्ला

बलुचिस्तान: पाकिस्तानात स्वतंत्र बलुचिस्तानासाठी सुरु असलेला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) या बंडखोर संघटनेने मंगळवारी रात्री उशिरा बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या सरकारी आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले केले. या गटाने "ऑपरेशन बाम (डॉन)" (Operation Baam) नामक मोहिमेद्वारे पाकिस्तानी राज्याविरुद्ध, दशकांपासून सुरू असलेल्या लढाईचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे.


एएनआयच्या वृत्तानुसार, बंडखोर संघटना बीएलएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे, या हल्ल्यासह, संघटनेने पाकिस्तानविरुद्धची वर्षानुवर्षे सुरू असलेली लढाई पुन्हा सुरू केली आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या विविध भागात, पंजगुर, सुर्ब, केच आणि खारानमध्ये एकूण १७ हल्ले करण्यात आले. यामुळे पाकिस्तानला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. असे असले तरी, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप नुकसानीचा संपूर्ण हिशेब दिलेला नाही, परंतु स्थानिक सूत्रांनी प्रभावित भागात लक्षणीय हानी झाल्याचे वृत्त दिले आहे.


एका निवेदनात, बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाहराम बलोच यांनी या मोहिमेचे वर्णन "बलूच राष्ट्रीय मुक्ती युद्धातील एक नवीन पहाट" असे केले, त्यांनी या हल्ल्याची माहिती देताना सांगितले कि, "ही कारवाई मकरन किनाऱ्यापासून कोह-ए-सुलेमान पर्वतांपर्यंत पसरली होती, ज्यामुळे गटाची विस्तारित ऑपरेशनल कूच किती दूरवर आहे हे अधोरेखित झाले. ते पुढे असे देखील म्हणाले कि, "ऑपरेशन बामची सुरुवात बलुच सैनिक किती मोठ्या प्रमाणात, समक्रमित ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहेत हे दाखवण्यासाठी केली आहे."


मेजर ग्वाहराम बलोच पुढे म्हणाले, ' या हल्ल्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले होते, जेणेकरून फक्त सुरक्षा दलांना आणि त्यांच्या परिसरांनाच नुकसान होऊ शकेल. तथापि, अद्याप मोठे नुकसान झालेले नाही. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सर्व तपशील देण्यात येतील.'

Comments
Add Comment

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता