अनेकदा मुंबईत असताना आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये मी जेवलो आहे. मंगळवार ८ जुलै २०२५ रोजी मी रात्री दोन पोळ्या (चपाती), डाळ (आमटी / दाल), भात (राइस) असे जेवण मागवले. जेवण आले. पहिला खास खाल्ला तेव्हाच गडबड आहे असे वाटले. दुसरा घास खाल्ला आणि उलटी झाली. उलटी झाली म्हणून मी आहे तसाच उठलो आणि कँटिनमध्ये गेलो. कँटिनमध्ये एक कर्मचारी समोर दिसला, त्याला विचारले की माझ्याकडे जेवण कोण घेऊन आले होते ? तिथे मॅनेजरलाही डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर जे काही झाले ती मी त्रास होत असताना दिलेली प्रतिक्रिया होती; असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मुंबई बाहेरचे आमदार आकाशवाणी आमदार निवासामध्ये वास्तव्यास आहेत. याच आमदार निवासात मंगळवारी ...