राज्य सरकारच्या योजनांची माहिती, सेवा मिळणार एकाच पोर्टलवर

योजनांच्या अंमलबजावणीमधील एकसूत्रतेसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय


मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध खात्यांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर, पोर्टलवर जाण्याचा त्रास आता संपुष्टात येणार आहे. योजनांचा लाभघेऊ इच्छिणाऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी, मासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच संवर्गातील अथवा स्तरातील लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांची माहिती, सेवा एकाच 'ऑनलाईल पोर्टल'वर मिळणार आहे.


या पोर्टलची माहिती लाभार्थ्यांना मिळावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी सामाईक मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन केंद्र संबधित महामंडळ विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येणार आहे.
राज्यातील समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी, कृषी या विभागांसह इतर सामाजिक सर्व विभागांच्या वतीने विविध संवर्गातील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी शासनाच्यावतीने या विभागांच्या अंतर्गत असलेल्या महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात.



अशा आहेत मार्गदर्शक बाबी



  • शासनाच्यावतीने नव्याने स्थापन होणारी सर्व महामंडळाची माहिती देखील या पोर्टलमध्ये समाविष्ट केली जाणार आहे.

  • सध्या अस्तित्वात असलेल्या महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेत कोणताही बदल न करता त्यांना या पोर्टलचा लाभ घेता येणार आहे.

  • सर्व महामंडळाच्या संकेतस्थळामध्ये एकसंधता राखता येणार आहे.

  • या पोर्टलचे कामकाज कसे सुरू आहे, याचा आढावा घेऊन त्यामध्ये काही। बदल करावयाचे असल्यास शासनाने एक समिती नियुक्त केली आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम