मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला तुफान मारहाण केली.
आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं. पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला धुतलं. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी हा मुद्दा आज विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उत्तर दिलं आहे.
मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असताना ...
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा...अशा लोकांना तुम्ही पाठींबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. तसेच एका आमदाराने कसं राहावं, बनियान, टॉवेलवर-लुंगीवर आमदार येतो. रस्त्यावर राहताय का?, असंही अनिल परब म्हणाले. यावर मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींने मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणी मुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं, ते चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
आमदाराच्या जेवणाच्या ताटात निकृष्ट डाळीची आमटी.
.
.#prahaarnewsline #viralvideo #sanjaygaikwad pic.twitter.com/taUVvuhOZE
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) July 9, 2025
नेमकं काय घडलं?
मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काल (८ जुलै) रात्री बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेली डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितलंय.