Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व पारदर्शक पध्दतीने होईल यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल तसेच हरियाणा व अन्य राज्यात राबवण्यात येणाऱ्या कॅशलेस योजनेचाही अभ्यास करू असे मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत आश्वस्त केले.


आमदार सत्यजित तांबे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय योजनेबाबत लक्षवेधी सूचना विधान परिषदेत उपस्थित केली होती. या लक्षवेधीला मुख्यमंत्र्यांच्या वतीने सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्री एँड आशिष शेलार यांनी उत्तर दिले.



त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये ५ लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण पुरविण्यात येते. ही योजना कॅशलेस आहे. सदर योजनेतील गट ब मध्ये शुभ्र पत्रिका धारक कुटुंबे (शासकीय निम शासकीय कर्मचारी यांसह) कोणत्याही प्रकारचे शिधापत्रक धारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अंगीकृत २१८४ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांना लाभ अनुज्ञेय आहे सदर योजनेमध्ये २०२०-२१ पासून आतापर्यंत एकूण ३७ लाख ६२ हजार ६०१ प्रकरणांमध्ये ६,९५८.२ कोटी इतका खर्च झालेला आहे.


शिवाय वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेत


सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षात शासनाने प्रतिपुर्तीसाठी अनुक्रमे २३८. १३ कोटी, २४८.३२ कोटी, २१३.८६ कोटी, २२६.४७ कोटी, आणि ३४६.१३ कोटी एवढा खर्च करण्यात आला, अशी माहिती देतानाच मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांगितले. ही पध्दत अधिक पारदर्शक करु असे त्यांनी आश्वस्त केले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती