महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या निर्देशान्वये व केंद्र शासनाच्या 'राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कार्यक्रम' आधारे, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कर्करोगाविरोधातील जनजागृती आणि तपासणी मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पुढाकार घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व विभागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व महानगरपालिका प्रसुतिगृहे येथे गर्भाशय मुख व स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० वर्षांवरील सर्व स्त्री, पुरुष यांची मुख कर्करोगाची तपासणी महानगरपालिका दवाखाना तथा आपला दवाखाना किंवा पॉलिक्लिनिक येथील दंतचिकित्सक व वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.


येत्या ४ फेब्रुवारी २०२६ जागतिक कर्करोग दिनानिमित्त “विविधतेत एकता” या उक्तीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सदर मोहिमेअंतर्गत सर्वांनी एकत्र येऊन कर्करोगाचे वेळीच निदान करावे व त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे. “मुंबई एकात्मिक कर्करोग प्रतिबंधक कार्यक्रम” फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत कर्करोग तपासणी, निदान आणि उपचाराकरिता संदर्भसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या मोहिमेसाठी टाटा स्मारक रुग्णालय खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि रुग्णालयांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये कर्करोग तपासणी, निदान आणि उपचारासाठी स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


कर्करोगाचे लवकर निदान आणि त्वरित उपचार हे मृत्यूदर कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. कर्करोगाची लक्षणे दिसताच तत्काळ निदान झाल्यास रोगाचा प्रसार रोखता येतो सुमारे २००० आशा तथा आरोग्य सेविका यांचे कर्करोग संबंधी प्रशिक्षण घेण्यात आले आहे. पुढील टप्प्यात परिचारिका, उर्वरीत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार येणार आहे. तसेच ठराविक दिवस व वेळेनुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक येथे 'कर्करोग तपासणी' सुरू आहे.


वय ३० वर्षे व त्यावरील वयोमान असलेल्या महिलांनी दर २ वर्षांनी स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे. तसेच, महिलांनी दर महिन्याला स्वत: स्तनातील बदल तपासावेत, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने करण्यात आले आहे. प्राथमिक लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेच्या दवाखान्यात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, प्रसुतिगृह अथवा रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


-जागतिक आरोग्य संघटनेच्या (२०२२) आकडेवारीनुसार, भारतामध्ये दरवर्षी कर्करोगाचे १४ लाख नवीन रुग्ण असण्याचे अनुमान...


- पुरुषांमध्ये जवळपास ५० टक्के मुख कर्करोग हे तंबाखूच्या सेवनामुळे


-सन २०२२ मधील मुंबईतील मृत्युंच्या नोंदीनुसार, एकूण मृत्युंपैकी ११ टक्के मृत्यू कर्करोगामुळे


- मौखिक कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग हे प्रमुख.


- मुख कर्करोगासाठी - २९५६०० जणांची तपासणी झाली आहे. या तपासणी अंतर्गत ३००० संशयित रूग्ण आढळले. या रुग्णांपैकी ६५० जणांची 'बायोप्सी' करण्यात आली. त्यात एकूण २४ रुग्णांचे मुख कर्करोगाचे निदान होऊन ते उपचार घेत आहेत.


- स्तन, गर्भाशय मुखाचा कर्करोग यासाठी ५४,१०० महिलांची तपासणी झाली. एकूण ३,६५६ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ३१४ रुग्णांची 'बायोप्सी' झाली आहे. तसेच रुग्णांचे ३२ निदान होऊन ते उपचार घेत आहेत.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा