भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा


बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना, ५८  वर्षात संसदेत माझी गैरहजेरी कधीही राहिलेली नाही. मात्र, दुर्दैवाने अजित पवार यांचा अपघात झाल्याने मी दिल्लीला जाऊ शकलो नाही. त्यामुळे मला सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकता आले नाही. पण मी जे काही वाचलं त्यावरुन दोन-तीन गोष्टी लक्षात येतात. अर्थसंकल्पात सामान्य माणसाला यातना होतील, असा नवा कोणताही कर लादण्यात आलेला नाही, ही एक समाधानाची गोष्ट आहे. अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा होती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.


राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबतही भाष्य केले. अमेरिकेने भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला एक-दोन गोष्टींची चिंता वाटते. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे चित्र आणखी एक दोन दिवसांत स्पष्ट होईल. यानंतर सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल. पण आता जे लोकांच्या समोर जे काही जाहीर करण्यात आलं आहे, त्यावरुन अमेरिकेला आता कृषी क्षेत्रात भारतात निर्यात करता येईल, अशी तरतूद या करारात आहे. ही गोष्ट भारतीय शेतकऱ्यांच्यादृष्टीने काळजी करण्यासारखी आहे. अमेरिका हा एक शक्तिशाली देश आहे. त्यांची आर्थिक ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या वस्तूचे उत्पादन अन्य देशांमध्ये निर्यात करायला सुरुवात केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या संबंधित भागावर होतो. भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये, ही माझ्यासारख्यांची अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले आहे.


अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत शरद पवार म्हणाले की, पेपरमध्ये वाचलं की आम्ही स्मारक उभारणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असलं पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू, असे आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले.


राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाही, असेही  शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की,परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याकडे आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही अधिकृतरित्या चर्चा केलेली नाही, शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले.


यावर सविस्तर बोलताना  शरद पवार म्हणाले की ,ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही. असे शरद पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)