जन्मदाखला घोटाळा, मालेगावात चौथा गुन्हा दाखल

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी पोलिस ठाण्यात मंगळवारी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच तक्रार दिली होती. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या चार झाली आहे.

बोगस जन्मदाखले प्रकरणी यापूर्वी छावणी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आता मंगळवारी मनपा आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर यांनी तक्रार दिली असून, यात अज्ञात व्यक्तीने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय मालेगाव यांच्याकडील जन्मनोंदणी आदेशाप्रमाणे बनावट जन्मनोंद आदेश बनविले तसेच तहसीलदार कार्यालयांचे शिक्का, सील जावक क्रमांक, सही करून जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडून जन्मनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करत शासनाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मालेगाव नायब तहसीलदार यांनी दिलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.

बनावट जन्मदाखले दाखवून ४० जणांनी काढले पासपोर्ट

बनावट जन्मदाखले प्रकरणात आतापर्यंत २१७ जण फरार असून, ४० जणांनी याच जन्म प्रमाणपत्राद्वारे पासपोर्टही काढल्याचे समोर आलेले आहे. तर महापालिकेचे जन्म-मृत्यू विभागाचे उपनिबंधक अब्दुल तव्वाब यांना याच प्रकारणात यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.
Comments
Add Comment

दारूच्या नशेत मुलाने ८० वर्षीय आईचा घेतला जीव!

कणकवली: माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पनवेलमध्ये गांजा तस्करीचा पर्दाफाश, दुकानावर छापा

नवी मुंबई: पनवेल तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत खैरणे गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजा व्यवसायाचा

मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तयार केलेल्या ई मेल अकाउंटद्वारे मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाला

बेल्जियममधून मेहुल चोक्सीला भारतात आणणार ?

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झाल्याचा आरोप असलेल्या हिरे व्यापारी

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य