खाजगी, अनधिकृत शालेय वाहतूक टाळा: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पालकांना आवाहन

  63

ठाणे: पालकांनी आपल्या मुलांना कोणत्याही खासगी किंवा शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. ७ जुलै २०२५ रोजी कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर घडलेल्या एका गंभीर अपघातानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.


या अपघातात अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूलमधील शिशु वर्गातील तीन विद्यार्थी एका भरधाव व्हॅनमधून (MH05FB4792) मागील दरवाजा उघडल्याने खाली पडून गंभीर जखमी झाले. व्हॅन चालकाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. याप्रकरणी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार व्हॅनवर दंडात्मक कारवाई करत ती जप्त करण्यात आली आहे.


या घटनेच्या पार्श्वभूमीवर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण यांनी सर्व पालकांना त्यांच्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि शालेय परवाना असलेल्या वाहनांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह

भाजपकडून गणेश भक्तांसाठी मोफत प्रवास!

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने ३५० मोफत बसेस आणि विशेष रेल्वे सेवांची

गणेशोत्सवासाठी मेट्रोची 'वेळेत' वाढ!

मुंबई: एमएमआरडीएने (MMRDA) जाहीर केले आहे की, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या ११ दिवसांसाठी मेट्रो मार्ग २ए आणि ७ वरील

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

स्पर्धकांनंतर आता बिग बॉस १९ चे ब्रँड स्पॉन्सर्स निश्चित

प्रतिनिधी:लवकरच हेवी एंटरटेनमेंट लोकप्रिय ड्रामा बिग बॉस १९ छोट्या पडद्यावर परतत आहे. २४ ऑगस्टला हा शो जिओ

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना