खिडकीत लटकलेल्या अवस्थेत होती चिमूरडी, शेजारच्यांनी वाचवलं, थरारक Video Viral

पुणे: कात्रज परिसरात एका चार वर्षांच्या चिमूरडीचा जीव थोडक्यात वाचला आहे. ही चिमूरडी खिडकीत धोकादायक अवस्थेत लटकलेली होती. घटनेच्या वेळी मुलगी घरात एकटी होती कारण तिची आई काही वेळेसाठी बाहेर गेली होती, आणि तिचे वडील घरी नव्हते. मुलीला खिडकीत खेळण्याची सवय होती, पण यादरम्यान तिचा पाय घसरला आणि ती खिडकीच्या फटीत अडकली. मुलीने ग्रिल धरून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आई परत आल्यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि मुलीला सुरक्षित बाहेर काढले. 

ऑफ-ड्युटी अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले


मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजच्या खोपडे नगर भागात तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून लटकलेल्या अवस्थेत आढळलेल्या चार वर्षांच्या मुलीला वाचवल्याने एक मोठी दुर्घटना टळली.  कोथरूड अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले योगेश  चव्हाण  यांनी आपात्कालीन स्थितीत मुलीला सुखरूप बाहेर काढले. कामाला सुट्टी असल्यामुळे चव्हाण घरी होते, त्यांना बाहेर गोंधळ ऐकू आला. चव्हाण चौकशी करण्यासाठी त्यांच्या गॅलरीत गेले तेव्हा त्यांना तिसऱ्या मजल्यावरील एका बंद अपार्टमेंटच्या बेडरूमच्या खिडकीतून एक मूल धोकादायकपणे लटकत असल्याचे दिसले. परिस्थितीची निकड ओळखून, चव्हाण इमारतीकडे धावले. मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना आढळले की दरवाजा बंद होता आणि मुलगी आत एकटीच होती. तिची आई तिच्या दुसऱ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी थोड्या वेळासाठी बाहेर पडली होती.


 


मदतीची वाट न पाहता, त्या चिमुरडीच्या आईला पाहताच चव्हाण यांनी आत प्रवेश केला आणि तातडीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून मुलीला घसरण्यापूर्वीच सुरक्षित आत ओढले. मुलीला वाचवतानाचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हा व्हिडिओ आणि ही घटना लहान मुलांना घरात एकटं सोडून जाणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन टाकणारा आहे.


 
Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अंदमान येथे अनावरण

'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रमाचे आयोजन नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे

जुन्नर वनविभागात बिबट्याचा हैदोस! २५ वर्षांत ५५ बळी, २८ हजार पशुधन फस्त; नसबंदी आणि AI कॅमेऱ्यांचा वापर करण्याची शासनाची माहिती

नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या

महाराष्ट्रात ६ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; केंद्र सरकारच्या अहवालाने गंभीर वास्तव उघड!

नागपूर : महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील गंभीर समस्या पुन्हा एकदा विधिमंडळात उघड झाली आहे. राज्यात गेल्या सहा

निर्ढावलेपणाला आळा घालणार!" बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यावर मंत्री संजय शिरसाट यांची सभागृहात कठोर भूमिका

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणावरून आज (गुरुवारी) विधान परिषदेत सत्ताधारी आणि

वाहतूक पोलिसांना ‘बॉडी कॅमेरे’ लावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा १००-२०० घेऊन गाड्या सोडणारे ट्रॅफिक पोलीस रडारवर नागपूर : ई-चलन फाडताना

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे