कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

  77

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे, ज्यामुळे २५० कोटींच्या करारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी शुभमन गिलचा एक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये गिलने नाइकी ब्रँडचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.


एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय डाव घोषित करताना शुबमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत गिल नाइकीचे काळ्या रंगाचे किट परिधान केलेला दिसला, जेव्हा बीसीसीआयचा अधिकृत किट प्रायोजक सध्या अ‍ॅडिडास आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लोक आता प्रश्न विचारत आहेत की, असे करणे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचे? बीसीसीआयचा किट प्रायोजक अ‍ॅडिडास असताना कर्णधार शुबमन गिलने उघडपणे नाइकीची बनियान घातल्याने अ‍ॅडिडास प्रश्न उपस्थित करू शकते. जर त्यांनी इच्छा दर्शवली, तर बीसीसीआय विरुद्ध नोटीस बजावली जाऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईसाठी ते कोर्टातही जाऊ शकतात. या प्रकरणात पुढे काय घडते, हे पाहणे महत्तवाचे ठरेल.


२०२३ मध्ये बीसीसीआयने अ‍ॅडिडाससोबत ५ वर्षांचा (२०२८ पर्यंत) करार केला होता, ज्याची किंमत २५० कोटींहून अधिक आहे. यापूर्वी नाइकी हेच भारतीय संघाचे किट प्रायोजक होते, पण त्यांचा करार २०२० मध्ये संपला. त्यानंतर बायजूस आणि एमपीएल यांसारखे प्रायोजक बीसीसीआयशी जोडले गेले. २०२३ मध्ये अ‍ॅडिडाससोबत हा मोठा करार झाला, जो सध्या कायम आहे.


तर शुबमन गिल हा नाइकीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, त्यामुळे त्याच्याकडे नाइकीची बनियान असणे स्वाभाविक आहे. एक मत असेही आहे की, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या खेळाडूकडून अशी चूक झाल्यास त्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. यामुळे या प्रकरणात गिलपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जबाबदार ठरेल.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब

Team India Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार

Team India T20 Squad for Asia Cup 2025: दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे.

आशिया कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: आशिया कप २०२५ साठी भारतीय क्रिकेट संघाची आज (१९ ऑगस्ट, २०२५) घोषणा होणार आहे. यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक