शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला दिल्यानंतर शुक्रवारी दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई केली. ही कारवाई केल्यामुळे येथील कबुतर खाना बंद होईल अशा प्रकारचे चित्र निर्माण केले जात असले तरी प्रत्यक्षात याठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सुरूच आहे. याठिकाणी येणाऱ्या कबुतर प्रेमींना दाणे उपलब्ध करून देण्यासाठी तीन वे चार दुकाने अस्तित्वात असून या विक्रेत्यांवर कारवाई केल्याशिवाय येथील कबुतर खाना बंद होणार नाही. दरम्यान, शनिवारीही कबुतर खाना चालूच होता आणि महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नव्हती. कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातक असल्याने मुंबईतील कबुतरांना खाद्य देणारी ठिकाण बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे.


मुंबई आणि कबुतर यांची एक वेगळी ओळख आहे आणि मुंबईतील अनेक भागांमध्ये कबुतर खाने आहे. मुंबईत अशाप्रकारे ५१ कबुतर खाने असून सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर तसेच निर्देशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादर कबुतर खान्यावरील छप्पर आणि तेथील साहित्य जप्त केले आणि या कबुतर खान्याची स्वच्छता केली.


शुक्रवारी या कबुतर खान्याची स्वच्छता केल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा पक्षीप्रेमी तथा कबुतर प्रेमी हे भूतदयेपोटी तसेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी दाणे टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी पुन्हा कबुतर खान्यातील कबुतरांचा वावर सुरू झाला आहे.



उपद्रव शोधकांची नियुक्ती करण्याकडे दुर्लक्ष


या कबुतर खान्यात चणे तसेच अन्य धान्य विक्री करणारे व्यवसायिक असून येथील जागेत हे विक्री करत आहेत. तसेच दादर कबुतर खान्यातूनही या दाण्यांची विक्री करत कबुतरांना टाकले जात आहे. या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतरही दाणे विक्री करत हे खाद्य कबुतराना
टाकले जात असल्याने कबुतर खाना पुन्हा एकदा सुरू झालेला दिसून आला आहे. मात्र, हा कबुतर खाना बंद करण्यात आल्यानंतर याठिकाणी दाणे टाकणा-यांवर कारवाई करण्यासाठी उपद्रव शोधकांची नियुक्ती न करता याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील रहिवासी आणि दुकानदारांच्या गते आथी कबुतरांना खाद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर महापालिकेने प्रथम कारवाई करावी आणि कबूतर खान्याची जागा कायम स्वच्छा राखल्यास हा कबुतर खाना बंद होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.


Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक