'बाळासाहेबांच्या काळातही ७० - ७४ आमदार निवडून यायचे'

लातूर : ठराविक प्रसारमाध्यमांकडून ठाकरे ब्रँडची चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात २८८ आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही ७० - ७४ आमदार निवडून यायचे, असे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

सध्याच्या राजकारणात नेता जनतेशी किती जोडलेला आहे हे महत्त्वाचे आहे. जनतेची किती कामं करतो हे पण महत्त्वाचं आहे; असेही बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही; असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. शनिवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची