मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

  77

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी गेल्या महिन्यातच याबाबतचे संकेत दिले होते. सुरूवातीला सेवाज्येष्ठतेनुसार क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर हळूहळू सगळ्या उच्च न्यायालयातील खंडपीठ, एकलपीठांच्या कामकाजांचेही थेट प्रक्षेपण सुरू केले जाईल.


न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करणारी जनहित याचिका वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी केली होती. त्यावरील मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व न्यायमूर्तीनी एकमताने काही न्यायालयांतील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी ठराव मंजूर केल्याचे म्हटले होते. त्यादृष्टीने तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात असून सुरूवातीला उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठता क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठांच्या काजकाजाचे थेट प्रक्षेपण होईल, असे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते.


त्या पार्श्वभूमीवर, उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेनुसार क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या कामकाजाचे सोमवारपासून थेट प्रक्षेपण होणार आहे. उच्च न्यायालय प्रशासनाच्या या निर्णयानुसार मुख्य न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले, न्यायमूर्ती एम. एस सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये, तसेच न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाच्या कामकाजाचे प्रक्षेपण होईल. न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाला मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचेही थेट प्रक्षेपण सुरू झाले आहे. याशिवाय गुजरात, कर्नाटक आणि ओडिशासह इतर उच्च न्यायालयांनीही आधीच कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केले आहे.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक