मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. नंतर केडिया यांनी एक्सवर माफीचा व्हिडिओ पोस्ट केला.

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर एक दिवस मीरा-भाईंदर शहरातील अमराठी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यानंतर संतापलेल्या केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे थेट आव्हान राज ठाकरे यांना दिले होते.या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी वरळी येथील डोममध्ये मेळाव्यासाठी जात असताना केडिया यांच्या कार्यालयावर नारळ आणि दगडफेक केली.

या घटनेत कार्यालयाच्या काचा फुटल्या असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना असा धडा शिकवला जाईल अशी भूमिका मनसैनिकांनी घेतली असून सुशील केडियाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. पोलिसांनी तणाव वाढू नये म्हणून तत्काळ हस्तक्षेप करत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यानंतर केडिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या वक्तव्याची माफी मागितली. त्यात त्यांनी म्हटले, मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी.
Comments
Add Comment

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची

मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल पाडणार... आता पुढे काय?

स्थानिक लोकांचा जोरदार विरोध, पुनर्वसनाच्या मागणीवर भर मुंबई: मुंबईतील १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ