अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ए या मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलीस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


शनिवार सकाळी ८ ते दुपारी २, रविवारी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग जड-अवजड वाहने इत्यादी वाहनांना बंदी असेल.तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने,रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक व पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव मिळेल. वाहन चालक व नागरिकांनी सहकार्य करावे, वाहतूक बंदीच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'