ठाकरे पिता-पुत्र आणि शरद पवार यांचा जुना व्हिडिओ व्हायरल, शिवसेनेने बोलतीच बंद केली

मुंबई: उबाठा गटाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'जय गुजरात'वरून लक्ष केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही ठाकरे पिता-पुत्र आणि शरद पवार यांचा जुना व्हिडिओ समोर आणत टिका करणार्‍यांची बोलतीच बंद केली आहे. शिवसेने व्हायरल केलेल्या व्हिडिओत शरद पवार हे 'जय हिंद जय कर्नाटक जय महाराष्ट्र' म्हणत आहेत. तर उद्धव ठाकरेंकडूनही जय गुजरातची २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतला व्हिडिओ समोर आणला आहे. इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरेंचा 'जय उत्तरप्रदेश म्हणाल्याचा व्हिडिओदेखील समोर आणला आहे. त्यामुळे आज ठाकरे बंधुकडून शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेण्याची शक्यता असतानाच शिंदेंनीही ठाकरेसह पवारांना त्यांची जागा दाखवली आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व्यासपीठावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती.



उद्धव ठाकरेंचांही 'जय गुजरातचा' नारा




विरोधकांच्या या टीकेनंतर शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्याचे पाहायला मिळत आहे.  यामध्ये उद्धव ठाकरे हे "आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात" म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न असे म्हणत शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.



मुख्यमंत्र्यांनीही केली शिंदेंची पाठराखण


मुंबईत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' म्हटले म्हणजे त्यांचे गुजरातवर प्रेम असून महाराष्ट्रावर प्रेम नाही असे समजणे चुकीचे आहे. त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण देत सांगितले की पवार साहेबांनी देखील एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये अशीच घोषणा दिली होती. त्यामुळे इतका संकुचित विचार कुणी करत असेल तर ते चुकीचे आहे आणि आता विरोधकांकडे मुद्दे नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले.

Comments
Add Comment

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर हल्लाबोल

पाटणा : बिहार विधानसभेच्या निकालांत एनडीएला मोठं यश मिळाल्यानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

अजित पवारांवर आली नामुष्की, स्वप्न अपूर्णच राहिले

पाटणा : आधी राष्ट्रीय पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस मोदींच्या नेतृत्वात भाजपचा प्रभाव वाढल्यामुळे

बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय जनता पार्टी (BJP) बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष

“२५ वर्षे मुंबई महापालिका लुटली” अमित साटमांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष वार

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आता पक्षाने थेट

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर