स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी राज्यभरात धडक मोहिम राबवणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्यासंदर्भात समिती नेमून अभ्यास करणार


मुंबई : "स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणी सरकार गंभीर आहे. राज्य शासनाच्या वतीने दर तीन महिन्याला प्रत्यक्ष तपासणी करून दोषींवर कारवाई करीत आहोत. तरीदेखील संपूर्ण राज्यभरात तपासणीची एक धडक मोहिम राबवू", अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.


जितेंद्र आव्हाड, हेमंत ओगले, बाबासाहेब देशमुख, नमिता मुंदडा, नितीन राऊत, प्रशांत बंब आदी आमदारांनी या चर्चेत सहभाग घेतला. मंत्री प्रकाश आबिटकर आपल्या उत्तरात म्हणाले की, "एका अहवालानुसार, राज्यात एक हजार पुरुषांमागे मुलींचे प्रमाण ९१३ आहे. लातूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही काम करणे गरजेचे आहे. हे काम प्रभावीपणे करण्यासाठी सर्वे, सूचना आणि तिथल्या अधिकाऱ्यांसोबत देखरेख करून निश्चितपणे चांगले काम करू. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन या संदर्भातील सध्या असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल."


जितेंद्र आव्हाड यांनी स्त्रीभ्रूणहत्या हे पातक आहे, जे डॉक्टर यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर मकोका लावा, अशी मागणी केली. यावर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यातील कलमांमध्ये सुधारणा करणार असल्याचे सांगितले. तसेच सरकारच्या वतीने सातत्याने याबाबतचा आढावा घेणे सुरु आहे. २०२३-२४ मध्ये ७५, २०२४-२५ मध्ये ९४ आणि आता जानेवारीपर्यंत ९० स्टिंग ऑपरेशन केले असून यातील दोषींवर कारवाई केली आहे. एकूण ६२७ न्यायालयीन प्रकरणांत १२९ जणांना शिक्षा झाली आहे. याबाबत अजूनही जागृकता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.



मासिक पाळीत महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार ?


"प्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखण्यासाठी कायद्याची कठोरपणे अमलबजावणी सुरू आहे. दोषी डॉक्टरांची सनद रद्द करण्याचे १९३ प्रस्ताव मेडिकल काऊन्सिलकडे पाठविली असून अनेकांच्या सनदा रद्दही झाल्या आहेत. या कायद्यातील कलमे अधिक कठोर करण्याचा निश्चित विचार करण्यात येईल. तसेच मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देता येईल का, गर्भलिंग निदान प्रकरणात मकोका लावता येईल का, याबाबत विधि व न्याय विभागाकडून सल्ला घेण्यात येईल", अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली.



खबरीला १ लाख रूपयांचे बक्षिस - मंत्री आबिटकर


बेकायदा गर्भजललिंग तपासणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देण्यासाठी खबरीला १ लाख रूपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तसेच मकोका लावता येऊ शकतो का हे तपासण्यासाठी विधि व न्याय विभागाचा सल्ला घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
तसेच, राज्यात दर हजारी स्त्री-पुरूष गुणोत्तरात काही जिल्ह्यात चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यात लातूर जिल्हा पुढे असून तिथे स्त्री-पुरूष गुणोत्तर १२६५ इतके आहे. वर्धा ११७३, धाराशिव १०५०, गडचिरोली १०९३ आणि गोंदिया येथे १०५० इतके गुणोत्तर असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Gold-Silver Price 18 August 2026 : आनंदवार्ता! सोने - चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन भाव

मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे