आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम


पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीत पायी चालत येतात. या पवित्र यात्रेत भक्तीचा गजर आणि विठ्ठलनामाचा जप तर आहेच, पण यंदा सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने या वारीला एक नवे परिमाण जोडले आहे.


सुमित ग्रुपच्या हजारो स्वयंसेवकांनी आषाढी वारी आणि परतवारीच्या मार्गावर स्वच्छतेचा संदेश देत, परिसराला निर्मळ आणि पवित्र ठेवण्याचा संकल्प पूर्ण केला.या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन सुमित पाटील यांनी केले असून, पराग सावंत, राहुल पारकर आणि चिन्मय परब यांनी या कार्याचे छायाचित्रण, निखिल पालंडे यांचे लेखन, सौरभ नाईक यांचे संकलन, रविराज कोलथरकर यांनी संगीत तर अभिनेते उदय सबनीस यांचा आवाज असून या अनोख्या उपक्रमाला चित्ररूप दिले आहे.




सुमित ग्रुपच्या स्वयंसेवकांनी वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर परिसरात अथक परिश्रम करत रस्ते स्वच्छ केले. या मोहिमेचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्वच्छतेच्या दूतांनी भक्ती आणि कर्तव्याचा संगम कसा घडवला, याचे सुंदर दर्शन घडते.


वारीदरम्यान चंद्रभागेच्या काठावर लाखो भाविकांचा मेळा जमतो. विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, पण परिसरातील अस्वच्छता अनेकांना खटकते. याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सुमित ग्रुपचे स्वयंसेवक 'माऊलीच्या लेकरां'प्रमाणे कार्यरत झाले. त्यांनी निस्वार्थ भावनेने स्वच्छतेचे कर्तव्य निभावले आणि परतवारीच्या पावित्र्याला जपले. या स्वयंसेवकांचे कार्य पाहून अनेक वारकऱ्यांच्या मनात स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण झाली. विठ्ठल माऊली केवळ विटेवर नाही, तर या स्वच्छता दूतांच्या रूपात भक्तांमध्ये वावरत असल्याची अनुभूती अनेकांना झाली.या मोहिमेच्या माध्यमातून सुमित ग्रुपने केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर भक्तीच्या प्रवाहात स्वच्छतेचे धागे विणले.



"वारी ही केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर कर्तव्य आणि जबाबदारीचा संगम आहे," असे सुमित पाटील यांनी सांगितले. श्रीरंग ट्रस्टने या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपत, स्वच्छतेच्या या संदेशाला व्यापक स्वरूप दिले.आषाढी वारीच्या या पवित्र प्रवासात सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश यांचा हा संगम प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग