पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने तिसर्‍या भाषेचा जीआर रद्द केला आहे. त्याचप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नव्या वेळापत्रकातूनही तिसरी भाषा हद्दपार झाली आहे.  त्यामुळे आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये फक्त दोनच भाषा शिकवल्या जाणार असून तिसऱ्या भाषेची सक्ती असणार नाही. त्याबरोबरच तिसऱ्या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ वाढवण्यात आला असून शाळांनी लवकरात लवकर विषयनिहाय तासिका विभागणीच्या आधारे वेळापत्रक तयार करावे, असे सुचवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे ८ मार्च २०२४ च्या शासन आदेशानुसार सक्तीचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांत यासंबंधीचा आदेश अंमलात आला आहे. हिंदी सक्तीची करण्याचा आदेश रद्द करणारा जीआर गुरुवारी काढला गेला.

तिसर्‍या भाषेच्या सक्तीवरून राज्यातून आलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द केला आहे. इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार तासिकांमधून तिसरी भाषा संपूर्णपणे वगळण्यात आली आहे. या तिसर्‍या भाषेच्या आठवड्यातील पाच तासिकांसाठी वर्ग केलेला आठवड्यातील २ तास ५५ मिनिटांची वेळ प्रथम भाषा, कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांमध्ये वाढवण्यात आली आहे.

आधीच्या वेळापत्रकात पहिल्या भाषेसाठी संपूर्ण आठवडाभरात ३५ मिनिटांच्या १५ तासिका होत्या. त्यात एका तासिकेची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय कला व हस्तकला विषयासाठी पूर्वीच्या ४ तासिकांऐवजी ३५ मिनिटांच्या ६ तासिका ठेवत ७० मिनिटे वाढवण्यात आली आहेत. क्रीडा आणि कार्यानुभव या दोन्ही विषयांसाठी पूर्वी ३५ मिनिटांच्या २ तासिका होत्या. आता त्यात एकेक तासिका वाढवण्यात आली आहे.३५ मिनिटांच्या ३ तासिकांमध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव असे उपक्रम घेता येणार आहेत. या तासिका कोणत्या विषयांसाठी वापरायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन