चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल


सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला मिळत असून लाखो पावले ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगत ही पावले पंढरीच्या दिशेने विठ्ठल भक्तीच्या ओढीने पुढे जात आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्याही भक्तिभावाने मार्गक्रमण करत आहेत. एका रिंगण सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून वारीची शिस्त, वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट लावणारा हा व्हिडीओ आहे.


डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या एका महिला वारकऱ्यासोबत एका चोपदाराने उद्धट वर्तन केल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे.


संत ज्ञानेश्वरांची पालखी गुरुवारी सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचे उभे रिंगण पार पडले. हे रिंगण झाल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले व तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला वारकऱ्यास जोरात ढकलून दिले. ती महिला वारकरी गोल रिंगण करून समोर बसलेल्या वारकऱ्याच्या अंगावर पडली. या महिला वारकऱ्याच्या डोक्यावरील तुळस पितळेची होती, दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. एवढे होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत, जोरजोराने ओरडत या महिलेशी ते वाद घालत होते.




  • माऊलींची शिकवण चोपदार विसरले

  • धक्का दिल्यावरही महिलेशी घातला वाद

  • वैष्णवांच्या उत्सवात धक्कादायक घटना


माऊलीच्या पालखीत महिला वारकऱ्यास दु:खद वागणूक


संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणजेच आई म्हणतात आणि याच माऊलीच्या पालखीत एका महिला वारकऱ्यास अशा पद्धतीची वागणूक येणे दुःखद आहे. त्यामुळेच, नेटीझन्सकडून या चोपदाराच्या उद्धटपणावर जोरदार प्रहार केला जात आहे. वारी म्हणजे शिस्त, शांती आणि प्रेमाची शिकवण देणारा वैष्णवांचा उत्सव. मात्र, माऊलींच्या पालखीतील हे चोपदार महाशय ही शिकवण विसरले काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार

निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांची यादी जाहीर; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

सिंधुदुर्गच्या प्रभारीपदी मंत्री नितेश राणे तर निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार यांची निवड मुंबई : राज्यातील

आता दुर्गम भागांतही इंटरनेट सेवा पोहोचेल

मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात स्टारलिंक कंपनीशी माहिती तंत्रज्ञान विभागाचा सामंजस्य

शरद पवारांना धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, अतुल देशमुखसह अनेक जण शिवसेनेत दाखल

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर होताच

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर?

भिगवण : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. तशी चर्चा भोर तालुक्यात जोर धरत

शिंदेंच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने झिडकारली

संजय गायकवाड-विजयराज शिंदे यांच्यात 'सिटिंग-गेटिंग'वरून जुंपली! बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या