IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कोणत्याही दबावापोटी राजीनामा दिलेला नाही. स्वच्छेने राजीनामा देत आहे, असे सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले.

सिद्धार्थ कौशल हे २०१२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. सिद्धार्थ कौशल २०१२ मध्ये आयपीएस झाले आणि त्यानंतर त्यांनी कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि अलिकडेच आंध्र प्रदेशात महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून जबाबदाऱ्या हाताळल्या.

भारतीय पोलीस सेवेचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणास्तव आणि पूर्ण विचार केल्यानंतर घेतला आहे. माझ्या जीवनातील ध्येय आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे; असे सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले राजीनाम्याचा कोणत्याही दबावाशी किंवा छळाशी संबंध नाही; असेही सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले. भारतीय पोलीस दलात सेवा करणे हा आयुष्यातील सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध करणारा प्रवास होता, असेही सिद्धार्थ कौशल म्हणाले.
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व