मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार केली. आपल्या खात्यात पहिल्याच षटकांत त्याने ज्यो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. दरम्यान, त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. यानंतर स्मिथ आणि ब्रूकने कमालीची फलंदाजी केली. दोघांमध्ये ३००हून अधिक धावांची भागीदारी झाली. मात्र ब्रूक बाद होताच इंग्लंडचा डाव कोसळला.
याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर ५८७ धावा केल्या होत्या. इंग्लंड १८० धावांनी पिछाडीवर आहे.
असा होता इंग्लंडचा डाव
इंग्लंड संघाची पहिल्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. १३ धावांवर त्यांना सलग दोन धक्के बसले. आकाशदीपने गेल्या सामन्यातील शतकवीर बेन डकेट आणि ओली पोप यांना शून्यावर बाद केले. तर जॅक क्राऊलीही काही खास करू शकला नाही. त्याने १९ धावा केल्या आणि तो सिराजच्या हाती बाद झाला. तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार झाली. सिराजने पहिल्याच षटकात जो रूट आणि बेन स्टोक्स यांना माघारी धाडले. स्टोक्सला खातेही खोलता आले नाही. रूटने २२ धावा केल्या होत्या.