मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेत स्थान देणार नाहीत. कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व धोक्यात येईल,असा टोला नारायण राणे यांनी लगावला. विधानभवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

अडीच वर्षात शिवसेना संपवली

ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात संपवली अस राणे म्हणाले. मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला कोण जबाबदार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना फक्त दोनच दिवस मंत्रालयात आले. आजच त्यांना मराठी कसे आठवले? मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?” जीआर कधी खोटं बोलेल का? कर्तृत्वशून्य व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

राज ठाकरेंना शिवसेनेत छळले

राज ठाकरे पक्षात शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप छळलं होते, शिवसेना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रवृत्त केलं, कुटुंब म्हणून किती जणांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं हे सांगावे? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.

कोण भरत गोगावले?

मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कोण भरत गोगावले मी ओळखत नाही असे सणसणीत उत्तर राणे यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment

राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार मुंबई : नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात

महाविद्यालयांमध्ये तब्ब्ल ५०१२ प्राध्यापकांची भरती; उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण विभागातर्फे मोठी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

मुंबई : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना

Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६