देशातील मुंबई पुण्यासह,प्रमुख शहरातील सराफा बाजारातील २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९९३३ रुपये तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर पातळी ९१०५ रूपये आहे.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीबाबत नव्या वक्तव्यांची बाजारातील गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच रेसिप्रोकल ट्रेडमध्ये अजून अंतिम बोलणी न झाल्याने भारतीय व परदेशी गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची वाट धरली आहे. सोन्याच्या मागणीत झालेल्या मोठ्या वाढीनंतर मागील आठवड्यात घसरणीनंतर सोन्याने पुन्हा तीन वेळा उसळी घेतली होती.यापूर्वी गुंतवणूकदारांना नव्या नफा बुकिंगची संधी पिवळ्या धातू (Yellow Metal ) ने दिली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी ही मर्यादित असल्यामागे युएस पेरोल डेटाही लवकरच अपेक्षित असल्याने युएस बाजारातील उसळीचा परिणाम म्हणून आज सकाळी १२ वाजेपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात मर्यादित वाढ होत आहे. नुकतेच युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिएतनामसोबत ट्रेड डील झाल्याचे घोषित केले होते. ज्याचा फायदा शेअर बाजारात काल अखेरच्या सत्रात दिसला होता. आता व्हिएतनामी आयातीवर युएस केवळ २०% शुल्क आकारणार आहे. अशातच मात्र भारत व युएस यांच्यातील व्यापार मतभेदाचा फटका भारतीय बाजारात बसत आहे. परिणामी बाजारातील सोन्याच्या गुंतवणूकीत अस्थिरता निर्माण झाली. गुंतवणूकदार अजूनही पेरोल डेटा व इंडिया युएस व्यापारी अंतिम बोलणी यांची वाट पाहत असल्याने गुंतवणूकदारांचा बाजारात सावध पवित्रा दिसून येत आहे.
आजच्या सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये ०.२८% वाढ सकाळपर्यंत झाली आहे. युएस गोल्ड ०.०७% घसरला आहे. एमसीएक्सवरील सोने निर्देशांकात दुपारपर्यंत किरकोळ घसरण होत निर्देशांक ०.०८% टक्के घसरला.
आज चांदीच्या दरातही किरकोळ वाढ
सलग दुसऱ्यांदा चांदीच्या दरातही वाढ कायम आहे. सोन्याच्या मागणीप्रमाणे चांदीच्या मागणीतही वाढ झाल्याने बाजारात चांदीचे दर वाढले आहेत. स्थावर गुंतवणूक सध्या रोलरकोस्टर स्थित्यंतरातून जात असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष आंतरराष्ट्रीय निर्देशांकावर आधारलेले आहे. प्रति ग्रॅम किंमत १ रूपयाने वाढत चांदीचा प्रति ग्रॅम पातळी १११ रूपयांवर पोहोचली आहे. तर प्रति किलो किंमत १००० रूपयांनी वाढत दरपातळी ११०००० रूपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या आंतरराष्ट्रीय सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत मोठी वाढ झाली आहे. निर्देशांकात तब्बल १.४२% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समधील (MCX) मधील चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत १.०५% वाढ झाली आहे.