अजिंक्य राऊत म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही.."

  55

वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास केला. हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं.अभिनेता म्हणतो वारी म्हणजे,“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!”

अजिंक्य राऊत झी टॉकीजवरील लोकप्रिय भक्तिपर कार्यक्रम ‘मन मंदिरा’ चा निवेदक आहे.रोज भक्तीचा अनुभव शब्दांमधून सादर करणारा अजिंक्य जेव्हा प्रत्यक्ष वारीच्या वाटेवर उतरतो, तेव्हा त्याचं मन भावुक होत. तो सांगतो, “जसं आपण एखाद्या ट्रेकला किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो – खडतर वाटा पार करत, अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेत – तसं काहीसं, पण हजारपटीने खोल, वारीत अनुभवायला मिळतं. इथे ऊन, पाऊस, थकवा, भूक… सगळं विसरून माणसं चालतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय – फक्त श्रद्धा आणि प्रेमामुळं.”
या प्रवासात अजिंक्यला अनेक भाविक भेटले. काही वृद्ध महिला गेली २५ वर्षं वारी करत होत्या. काही तरुण पहिल्यांदाच आले होते. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाची तीच झळक होती. कोणी पाणी देत होतं, कोणी खाऊ वाटत होतं, आणि कोणीतरी फक्त सोबतीनं चालत होतं. वारी म्हणजे माणुसकीचा जिवंत अनुभव आहे.

वारी ही फक्त वैयक्तिक नाही, ती सामाजिक आणि कौटुंबिकही आहे. एक वारकरी अजिंक्यला म्हणाला,“दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र येतो. ही चाल आम्हाला केवळ विठोबाजवळ नेते असं नाही, तर आम्हा सगळ्यांना एकमेकांजवळ आणते. या प्रवासातून आम्हाला पुढच्या वर्षासाठी ऊर्जा मिळते.म्हणून आम्ही दरवर्षी येतो.” या शब्दांत वारीचं खरेपण वर्णन केल आहे. ही एक श्रद्धेची यात्रा असली तरी, ती माणसांमधल्या नात्यांची आणि सामर्थ्याची देखील यात्रा आहे.

झी टॉकीजने यंदा ‘मन मंदिरा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या वारीचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर उपक्रम राबवला. वारीदरम्यान घेतलेली हृदयस्पर्शी दृश्यफुटेज, भाविकांचे अनुभव, आणि अजिंक्य राऊतची भावनिक भेट… हे सगळं ‘मन मंदिरा’च्या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.शेवटी अजिंक्य म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही, ती चालल्यावरच उमगत जाते… आणि एकदा उमगली की ती आयुष्यभर आपल्याला साथ देते!”
Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा