Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक 


मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक म्हणाले, गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील " विठुराया" ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे. अर्थात, हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.


आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.

Comments
Add Comment

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

इंदुरीकर महाराज सोशल मीडियावरील टीकेने व्यथित, कीर्तन बंद करण्याचा दिला इशारा!

मुंबई : वारकरी संप्रदायातील समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार

जमीन घोटाळा चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? असा सवाल करून मुख्यमंत्री

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! "कोणी 'माईचा लाल' आला तरी...योजनेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा सडेतोड इशारा

मुंबई : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) महिला