कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष


डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण १८ जागांपैकी १५ जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून २ जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी पाचपर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या ९०.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत २३५८ मतदारांपैकी तब्बल २१३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांपैकी एकूण १७ जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ५१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.


या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी  एकूण ७,१७,१०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण ५२.११% मतदान !

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दि.15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ९,१७,१२३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; एकूण ५५.५९ टक्के टक्के मतदान

ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत

ठाण्यात सुमारे ५५ टक्के मतदान

मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३०