Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

  65

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडला.  अधिवेशनाचा पहिला दिवस हा हिंदी सक्तीवरून गाजला तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झालेले दिसून आले. या संदर्भात शक्तिपीठ महामार्ग बंद करण्याचे आवाहन सरकारला विरोधकांनी केली. तसेच

मंगळवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.  कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्न-उत्तराचे सदर झाले. ज्यामध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आले. ज्यात इंद्रयणी नदीवरील जीर्ण पूल अपघाताचा मुद्दा देखील उचलून धरला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी या सदरात कुंडमळा पूल अपघातासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार अशा पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल प्रश्न विचारला.

काय म्हणाले चेतन तुपे?


चेतन तुपे यांनी कुंडमळा दुर्घटनेसंबंधीत, शासन कोणती कारवाई करणार याबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "अशा पुलांवर पर्यटकांची गर्दी जर झाली तर ते ढासळण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे यानंतरही असे कमकुवत पूल आढळले, तर काय कारवाई करणार? आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी ही सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उत्तर


चेतन तुपे यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी म्हंटले, "पूल धोकादायक असल्याचा फलक लावून देखील, पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जमले. याठिकाणी जास्त पर्यटक आल्यामुळे पुल कोसळला, त्यात चार लोकांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर आहे. राज्यात असे अनेक धोकादायक पूल आणि पर्यटन स्थळ आहेत.  सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १६ हजार ३९५ पुल राज्यात आहेत. पावसाळ्याआधी या सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानुसार राज्यात चार पुल अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. तसेच आठ पुलांचे अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल हाती यायचे बाकी आहेत. पण या चार व आठ अशा बारा पुलांची डागडुजी व बांधणी करण्याबाबत कार्यवाई करू." असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याचप्रमाणे, अशी घटना पुढे पुन्हा कधीच घडणार नाही यासाठी योग्य ती अंमलबजावणी आणि खबरदारी घेत असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "इंद्रायणी नदीवर अपघातग्रस्त पूल नव्याने बांधण्याचे नियोजन केले जाईल, असे पुल ज्याठिकाणी असतील, तिथे ते वापरू नयेत म्हणून फलक लावून पूर्णपणे बंद केले जातील. त्यासाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाईल."

 
Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल